Fatal attack on Seema Haider : नोएडाजवळी रबूपुरा गावात राहणाऱ्या सीमा हैदर (Seema Haider) या पाकिस्तानी महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. गुजरातमधून आलेल्या एका तरुणाने घरात घुसून हा हल्ला केल्याचं समोर आलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तेजस झानी (Tejas Jhani) असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली.
मविआकडून अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर; ठाकरे गटाच्या नेत्यानी ठेवली ‘ही’ अट
तेजस झानी हा गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. शनिवारी तो ट्रेनने दिल्लीला पोहोचला. यानंतर तो वेगवेगळ्या मार्गांनी रबुपुरा येथील सीमा हैदरच्या घरी पोहोचला. तेव्हा त्याला तिच्या घराचा दरवाजा बंद दिसला. त्यामुळं आरोपीने दारावर लाथ मारल्या. सीमाने दार उघडताच आरोपीने तिच्यावर हल्ला केला आणि तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर सीमाने आरडा-ओरडा करताच परिसरातील नागरिक धाव घेतली. आणि त्यांनी आरोपी तरुणाला पकडून मारहाण केली. ही घटना ३ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
मंत्रिमंडळ बैठकीसाठी खास मेन्यू; शिपी आमटी, पुरणपोळी अन् शेंगोळ्यांचा बेत
दरम्यान, सीमा हैदरवरील हल्ल्याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली, त्याचा मोबाईल फोन जप्त केला असून त्याची चौकशी सुरू झाली. आरोपीने दावा केला की सीमा हैदरने आपल्यावर काळी जादू केली होती. तर आरोपीचे मानसिक स्वास्थ स्थिर नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
कोण आहे सीमा हैदर?
मूळची पाकिस्तानी नागरिक असलेली सीमा हैदर २०२३ मध्ये नेपाळमार्गे भारतात आली. तिचा दावा आहे की PUBG खेळत असताना तिची नोएडातील सचिनशी ओळख झाली आणि ते दोघेही प्रेमात पडले. नंतर दोघांनी नेपाळमध्ये लग्न केल्याचं ती सांगते.
दरम्यान, सीमा हैदरचे वकील ए.पी. सिंह यांनी यापूर्वी सांगितलंय की, तिने हिंदू धर्म स्वीकारला असून आता ती एक सनातनी महिला आहे. अलिकडेच, भारत सरकारने पाकिस्तानातून आलेल्या काही भारतीयांचे व्हिसा रद्द केल्यांतर सीमाला पाकिस्तानात परत पाठवण्याचा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा आपण भारताची सून असून आपल्याला भारतात राहू द्या, अशी मागणी सीमा हैदरने केली आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे ही मागणी केली आहे.