Sanjiv Khanna: सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court) न्यायमूर्ती संजीव खन्ना (Sanjeev Khanna) यांची भारताचे नवे सरन्यायाधिश म्हणून आज नियुक्ती झाली. खन्ना यांची भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) यांनी ही घोषणा केली.
दिवंगत सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी गेल्या आठवड्यातच संजीव खन्ना यांचे नाव सुचवले होते. यानंतर आता राष्ट्रपतींनी खन्ना यांच्या नावाला मंजुरी दिली असून त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ते 11 नोव्हेंबरला सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. चंद्रचूड यांच्यानंतर संजीव खन्ना हे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी काही ऐतिहासिक आणि महत्त्वाचे निकाल दिले.
Centre notifies the appointment of Justice Sanjeev Khanna as the next Chief Justice of India, effective from November 11th. His appointment follows the retirement of the current Chief Justice DY Chandrachud pic.twitter.com/YO9wniuUsK
— ANI (@ANI) October 24, 2024
चंद्रचूड यांचा कार्यकाळ 8 नोव्हेंबर 2024 रोजी संपेल, त्यानंतर न्यायमूर्ती खन्ना सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारतील.
केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी खन्ना यांच्या नियुक्तीसंदर्भात ट्विट केलं. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांचा वापर करून, राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर न्या. खन्ना यांची नियुक्ती केल्याचा आनंद आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना हे 11 नोव्हेंबर 2024 पासून भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम करतील, असं ते म्हणाले.
कोण आहेत संजीव खन्ना?
संजीव खन्ना यांचा जन्म 14 मे 1960 रोजी झाला असून सुमारे चार दशकांहून अधिक काळ ते न्यायिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 1983 मध्ये दिल्ली बार कौन्सिलचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालय, नंतर दिल्ली उच्च न्यायालय आणि विविध लवाद लवांदांमध्ये वकिली केली. न्यायमूर्ती खन्ना यांनी आयकर विभागाचे वरिष्ठ वकील म्हणून काम केले आणि 2004 मध्ये एनसीटी ऑफ दिल्ली (सिव्हिल) विभागासाठी वकिलीही केली. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात काही फौजदारी खटल्यांमध्ये अतिरिक्त सरकारी वकील म्हणूनही काम केले.
2005 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून रुजू झाले. पुढं त्यांची 18 जानेवारी 2019 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून निवड झाली. न्या. संजीव खन्ना सध्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.