Download App

Sensex-Nifty ग्रीन झोनमध्ये बंद; तरी देखील गुंतवणुकदारांचे 1.84 लाख कोटी बुडाले

Sensex-Nifty : जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडमुळे आज देशांतर्गत बाजारामध्ये बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. आज शेअर बाजाराची (Share Market) सुरुवात जरी फ्लॅट झाली असली तरी इक्विटी बेंचमार्क इंडेक्स बीएससी सेन्सेक्स आणि निफ्टी 50 (Sensex-Nifty) चांगल्या वाढीसह बंद झाले. बाजारात आज बँकिंगच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. तर दुसरीकडे धातू,ऑईल आणि गॅसच्या शेअर्समध्ये घट पाहायला मिळाली. या चढउतारामध्ये निफ्टी 50 चे 27 आणि सेन्सेक्सचे 16 शेअर्स वाढीसह बंद झाले.

कांशीराम यांना भारतरत्न द्यावा, दलित व्यक्तीमत्वांची उपेक्षा करणं…; मायावतींचं ट्विट चर्चेत

मात्र यामध्ये देखील गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं. याचं कारण असं की, बेंच मार्क इंडेक्स वाढीसह बंद झाले. मात्र बीएसईवर लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 1.84 लाख कोटींची घट झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांना तब्बल 1.84 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. याचं कारण म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कोणतेही बदल किंवा दर कमी न केल्यामुळे आज मिडकॅप आणि स्मॉल कॅप मध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

‘माझा गेम करण्याचा कट फडणवीसांनी रचला होता’; नितीन देशमुखांचा गंभीर आरोप

सेन्सेक्स बद्दल सांगायचं झालं तर दिवसाच्या शेवटी 167.06 पॉईंट्स म्हणजे 0.23% वाढीसह 71595.49 तर निफ्टी 64.55 पॉईंट्स म्हणजे 0.30% घसरणीसह 21782.50 वर बंद झाली. त्यामुळे काल (8 फेब्रुवारी) ला बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सची एकूण मार्केट कॅप 388.21 लाख कोटी होती. जी आज घसरून 386.36 लाख कोटी रुपयांवर आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचं 1.84 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाले आहे.

यामध्ये सेन्सेक्सवर लिस्टेड असलेल्या 30 शेअर्स पैकी 16 शेअर्स आज ग्रीन झोनमध्ये बंद झाले. यामध्ये सर्वाधिक तेजी एसबीआय, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक या शेअर्समध्ये पाहायला मिळाली. तर दुसरीकडे एम अँड एम भारती एअरटेल आणि एनटीपीसी या शेअर्समध्ये सर्वात जास्त घसरण झाली.

follow us

वेब स्टोरीज