कांशीराम यांना भारतरत्न द्यावा, दलित व्यक्तीमत्वांची उपेक्षा करणं…; मायावतींचं ट्विट चर्चेत

  • Written By: Published:
कांशीराम यांना भारतरत्न द्यावा, दलित व्यक्तीमत्वांची उपेक्षा करणं…; मायावतींचं ट्विट चर्चेत

Mayawati on Bharatratna award : काँग्रेस नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव (P.V. Narasimha Rao) यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज केली. नरसिंह राव यांच्यासोबतच माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग आणि कृषी क्षेत्रात क्रांती आणणारे डॉ. एम. एस. स्मामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले. या पुरस्कारांच्या घोषणेनंतर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनीही आनंद व्यक्त केला. मात्र यावेळी त्यांनी एक महत्वाची मागणी केली.

Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya शाहिद अन् क्रितीचा चित्रपट पाहण्याची 5 कारणे!

आज देशातील तीन महत्वाच्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले. तर याआधी काहीच दिवसांपूर्वी लालकृष्ण अडवाणी आणि कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणाही करण्यात आली होती. दरम्यान, आता मायावती यांनी कांशीराम यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी केली.

मायावतींनी सोशल मीडिया X वर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, विद्यमान भाजप सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित केलेल्य सर्व व्यक्तीमत्वांचे स्वागत आहे. पण या प्रकरणात विशेषतः दलित व्यक्तिमत्त्वांचा अनादर आणि उपेक्षा करणं अजिबात योग्य नाही. सरकारने याकडेही लक्ष दिले पाहिजे, असे मायावती म्हणाल्या आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर व्ही.पी.सिंग यांच्या सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित केले. त्यानंतर दलित आणि वंचितांचे आदरस्थान असलेले कांशीराम यांनी केलेला संघर्ष काही कमी नव्हता. त्यांनाही भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी मायावतींनी केली आहे.

Pakistan Elections : दहशतवादी हाफिज सईदच्या मुलाचा निवडणुकीत पराभव; फक्त ‘इतकी’ मते मिळाली 

चरणसिंग यांना भारतरत्न मिळणे हा शेतकऱ्यांचा सन्मान : योगी

तर दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देण्याच्या घोषणेचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग हे शेतकऱ्यांचे मसिहा होते आणि आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी शेतकरी, शोषित आणि वंचितांच्या उन्नतीसाठी समर्पित केले होतं. त्यांना ‘भारतरत्न’ देण्याची घोषणा झाली. ही खरोखर प्रशंसनीय बाब आहे.
चरणसिंग यांचं योगदान फार मोठं आहे. चरणसिंग यांना भारतरत्न मिळणे हा शेतकऱ्यांचा सन्मान आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube