Download App

Sharad Pawar : ते म्हणतात ‘ये मोदी की गॅरंटी है’ पण ती काही खरी नाही; पवारांनी पाढाचं वाचला

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नेहमी बोलल्या जाणाऱ्या ‘ये मोदी की गॅरंटी है’ या वक्यावरून टीका करण्यात आली. शरद पवार हे राष्ट्रवादीच्या शिर्डीतील मेळाव्यामध्ये बोलत होते. अहमदनगरमधील शिर्डी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे दोन दिवस शिबिर सुरू आहे. दुसऱ्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी भाजप आणि मोदींवर टीका केली.

ते म्हणतात ‘ये मोदी की गॅरंटी’ पण ती गॅरंटी काही खरी नाही…

यावेळी पवार म्हणाले की, आज देशात अस्वस्थता आहे. याचं कारण म्हणजे देशाचे चित्र वेगळे झालं आहे. भाजप आणि त्यांचे सहकाऱ्यांच्या हातात सत्ता आहे. तसेच त्यांच्याकडून एक आक्रमक प्राचार यंत्रणा त्यांनी प्रत्येक राज्यातून राबवली आहे. आक्रमक प्रचार यंत्रणेतून जसे हिटलरच्या जर्मनीमध्ये गोबेल्स नीती याबाबतची चर्चा होती. त्याचप्रमाणे असत्यावर आधारित असलेली अनेक गोष्टी जनमाणसांमध्ये प्रसारित करण्याचे काम भारतीय जनता पार्टीकडून केले जात आहे.

रश्मी शुक्ला राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक : फडणवीस -शिंदेंच्या निकटवर्तीय म्हणून ओळख

लोक अस्वस्थ आहेत. सध्याचे चित्र भाजपासाठी अनुकूल नाही. मात्र भाजपकडून सातत्याने सांगितले जाते की, आम्ही लोकसभेमध्ये 415 जागा जिंकू पण देशात तशी स्थिती नाही. केरळमध्ये कम्युनिस्ट आणि काँग्रेसचे सरकार आहे. तेथे तामिळनाडू मध्ये भाजप नाही. आंध्रमध्ये भाजप नाही. तसेच झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये देखील भाजपची सत्ता नाही. तसेच दिल्ली आणि पंजाब या ठिकाणी देखील भाजपची सत्ता नाही. त्याचबरोबर ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे. ते स्वतःच्या ताकदीवर आलेली सत्ता नाही. यामध्ये गोवा २०१८ मध्ये मध्य प्रदेशमध्ये आलेल्या सरकार यांचा उल्लेख शरद पवारांनी केला.

‘भपकेबाजीला घाबरु नका, सत्तेत फुकवटा असतो’; जयंत पाटलांची टोलेबाजी

त्यामुळे आज देशांमध्ये भाजपासाठी अनुकूल वातावरण नसल्यास त्यांनी म्हटलं. आपल्या हातामध्ये सत्ता आल्यानंतर त्या सत्तेतून अनेक आश्वासन आणि कार्यक्रम भाजपने घेतले. मात्र त्याचे अंमलबजावणी न करता जनतेची फसवणूक भाजपने केली. हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेमध्ये क्वचितच येतात. त्यावेळी ते संसदेमध्ये एखादं धोरण उपयुक्त असो वा नसो अशा प्रकारे मांडतात की, ते पाहून संसदेतील सदस्य सुद्धा थक्क होतात. घोषणा देखील खूप करतात.

‘दिल्लीश्वरांनी डोळे वटारले की ते घाबरतात’; सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर टीका

2016 17 मध्ये अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की, 2022 पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू. आज 2024 सुरू झाले मात्र काहीही झाले नाही. त्याचबरोबर त्यांनी 2022 पर्यंत शहरी भागातील लोकांना पक्की घर देण्याचे आश्वासन दिलं होतं. ते बोलताना म्हणतात, की ‘ये मोदी की गॅरंटी है पण त्यांची गॅरंटी काही खरी नाही. याचा अनुभव अनेकदा आलेला आहे.

त्याचबरोबर देशात सध्या तरुण पिढी बेरोजगारीमुळे अस्वस्थ आहे. त्याचाच परिणाम म्हणून दोन तरुणांनी संसदेमध्ये घुसखोरी केली. मात्र हे तरुणांनी घुसखोरी का केली? ते कोण होते? त्याच्याबद्दल कोणतीही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत दिली नाही. त्यामुळेच विरोधी पक्षाने त्यावर हल्लाबोल केला. असता परिणामी असंख्य खासदारांचे निलंबन करण्यात आलं. अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांचा नंबर लागला. असं म्हणत शरद पवारांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

follow us