NCP Criticized Gas Price Hike PM Modi Open In Letter : एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ झालीय. या वाढीचा परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे. यामुळे आता सर्वसामान्याचं जेवण देखील महागणार. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ जाहीर केली (Gas Price Hike) आहे. आता एलपीजी सिलिंडर 853 रुपयांना उपलब्ध होईल, असं जाहीर केलंय. यापूर्वी तो 803 रुपयांना होता. यावरून मात्र शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोदी सरकारला (PM Modi) घेरलंय.
त्यांनी (NCP) एक गॅस दरवाढीवर मोदी सरकारचं खुलं पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी म्हटलंय की, प्रिय देशवासीयांनो…तुमच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा एकदा सत्तेची ऊब अनुभवत आहोत. पण आम्ही सत्ताधीश होण्यासाठी केलेल्या करामतींची किंमत चुकवण्याची वेळ आता आली आहे. म्हणूनच आम्ही पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची सौम्य दरवाढ करतोय. तर आता तुम्हाला महागाईची धग सहन करावी लागेल, तर कृपया निमूटपणे सहन करा. वाईट वाटून घेऊ नका, ‘भाव बढ़ेंगे तो हि हम बचेंगे’ हे तुम्हाला एव्हाना कळालं असेलच.
अक्षय शिंदेचे पालक मागील दीड महिन्यापासून बेपत्ता.. बदलापूर प्रकरणात नवीन ट्विस्ट
चिंता करू नका…. पुढील निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आम्ही पुन्हा एकदा गॅस दर कमी करू आणि सामान्य माणसाच्या हितासाठी तुमचं मत मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. तुमचं लाडकं महागाईच्या गोदीत बसलेलं मोदी सरकार.
गॅस दरवाढीचा भडका उडू नये म्हणून मोदी सरकारचं देशवासियांसाठी खुलं पत्र ! pic.twitter.com/rIWfyrGZ8B
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 8, 2025
गॅस दरवाढीनंतर देशभरात नाराजीचं वातावरण आहे. असं असतानाच आता विरोधकांनी देखील मोदी सरकारला घेरलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने जनतेसाठी मोदी सरकारकडून एक खुलं पत्र लिहिलंय. या पत्रामध्ये मोदी सरकारच्या धोरणावर खोचक टीका करण्यात आलीय. मोदी सरकारच्या धोरणाचा समाचार घेत असताना जनतेला दरवाढ सहन करण्याशिवाय पर्याय नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.
मनसेची मान्यता रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका; राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं
शरद पवार गटाने या पत्रातून मोदी सरकारवर टीका केलीय. मोदी सरकार जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप त्यांनी या पत्रातून केलाय. मोदी सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची दरवाढ लागू करण्यात आली असून ती आज 8 एप्रिलपासून लागू करण्यात येत आहे.