Stock Markets & Assembly Election Results 2024 : जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections 2024) मतमोजणी सुरू आहे. या निकालात सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेस आघाडीवर (Congress Party) होती. त्याचवेळी शेअर बाजाराची सुरुवातही (Share Market) अडखळत झाली होती. मात्र थोड्याच वेळात चित्रच पालटलं. हरियाणात पिछाडीवर (Haryana Assembly Election Results) पडलेल्या भाजपने जोरदार मुसंडी मारली. सध्याच्या परिस्थितीत भाजप 49 जागांवर आघाडीवर असून बहुमताचा आकडाही पार केला आहे. या घडामोडींचा परिणाम शेअर मार्केटवर दिसला. सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी तेजी आली.
आज शेअर बाजार जास्त हेलकावे खाताना दिसला. याचा परिणाम अदानी उद्योग समुहाच्या विविध शेअर्सवर दिसून आला. सुरुवातीच्या व्यापारात सेन्सेक्स 87 अंकांच्या तेजीसह 81 हजार 176 च्या पातळीवर व्यवहार करत होता. तर निफ्टीही 14 अंकांच्या वाढीसह 25 हजार 813 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसून आला. निफ्टीत सहभागी असणाऱ्या 50 शेअर्समध्ये 24 शेअर्स चांगली कामगिरी करत आहेत. तर 26 शेअर्स मात्र लाल रंगात दिसत आहेत. आजच्या व्यापारात मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण होत असल्याचे दिसून आले.
Video: जम्मू काश्मीर अन् हरियाणा निवडणुकीचा आज निकाल; शिवसेना नेते संजय राऊतांचा मोठा दावा
मागील सहा दिवसांपासून शेअर बाजार अडखळत होता. आजही निवडणूक निकाला भाजप पिछाडीवर होता तोपर्यंत शेअर बाजारही सुस्तावलेला होता. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा काँग्रेसने हरियाणात मोठी आघाडी घेतली होती. परंतु, दीड तासातच सगळा पिक्चरच बदलला. भाजपने जोरदार मुसंडी मारली. काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली. सध्याच्या मतमोजणीच्या कलांनुसार भाजप 48 तर काँग्रेस 36 जागांवर आघाडीवरआहे.
आज सकाळी निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये चढ उतार दिसत होता. भाजपने आघाडी घेतल्यानंतर निफ्टीत जवळपास 150 अंकांची वाढ दिसून आली. निफ्टीच्या 50 पैकी 30 समभागांत मोठी खरेदी होताना दिसत आहे. यामध्ये अदानी पोर्टस सर्वाधिक फायद्यात दिसत आहे. तर बीईएल, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, अदानी एंटरप्रायजेस शेअर्स तेजीत दिसत आहेत. टाटा स्टील, जेएसडब्ल्यू आणि हिंदाल्को निफ्टीचे टॉप लूजर्स ठरले आहेत. तसेट टाटा मोटर्स आणि एसबीआय लाईफचे शेअर्समध्येही घसरण दिसून येत आहे.
हरियाणात आप साफ! केजरीवाल-सिसोदियांच्या प्रचाराचा परिणाम शून्य, सर्वत्र पिछाडी