अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या (Shree Ram) गर्भगृहात शुक्रवारी (19 जानेवारी) प्रभू श्रीरामांची बाल रुपातील मूर्ती ठेवण्यात आली. त्याचे फोटोही आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्वतः मंदिर प्रशासनानेच हे फोटो प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये रामललाच्या डोळे कापडाने झाकण्यात आले आहेत. हे कापड मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर काढले जाणार आहे.
शुक्रवारी सायंकाळी रामललाच्या मूर्तीचे आणखी काही फोटो व्हायरल झाले. यात मूर्तीचा संपू्र्ण चेहरा दिसून येत होता. त्यामुळे आता पट्टी नसलेला फोटो खरा की पट्टी असलेला फोटो असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Chief Priest Acharya Satyendra Das on viral photo)
याबाबत श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास (Acharya Satyendra Das) म्हणाले, “प्राणप्रतिष्ठा पूर्ण होण्यापूर्वी प्रभू रामाच्या मूर्तीचे डोळे झाकलेलेच असतात. ज्या मूर्तीत श्रीरामाचे डोळे दिसून येत आहेत, ती खरी मूर्ती नाही. तरीही ती खरी मूर्ती असेल आणि तिचे डोळे दाखवले जात असतील तर हा फोटो कोणी काढला आणि कसा व्हायरल केला याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.
#WATCH | Ayodhya: On the idol of Lord Ram, Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Chief Priest Acharya Satyendra Das says, "…The eyes of Lord Ram's idol cannot be revealed before Pran Pratishtha is completed. The idol where the eyes of Lord Ram can be seen is not the real idol. If… pic.twitter.com/I0FjRfCQRp
— ANI (@ANI) January 20, 2024
प्रभू श्रीरामाची बाल रुपाती मूर्ती शुक्रवारी पूर्ण विधीवत गर्भगृहात ठेवण्यात आली. या मूर्तीचा 22 जानेवारीला अभिषेक करण्यात येणार असून त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन होणार आहे. गाभाऱ्यात मूर्ती ठेवल्यानंतर तिचे डोळे कापडाने झाकलेले फोटो मंदिर प्रशासनाने प्रसिद्ध केले.
प्रभू श्रीरामाची मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केलेली आहे. ही 51 इंचाची मूर्ती गुरुवारी पहाटे मंदिरात आणण्यात आली. प्राणप्रतिष्ठा होत असलेली श्रीरामांची मूर्ती 5 वर्षांच्या रुपातील आहे. अरुण योगीराज हे कर्नाटकचे रहिवासी असून त्यांच्या कुटुंबाला शिल्पकलेचा पाच पिढ्यांचा वारला लाभला आहे, अरुण योगीराज हेही सध्या देशातील सर्वात प्रसिद्ध शिल्पकार आहेत.