Sidhu Moose wala : प्रसिद्ध दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची (Sidhu Moose wala) आई चरण कौर 58 व्या वर्षी गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. याचं महिन्यात सिद्धूची आई बाळाला जन्म देणार आहे. त्यांनी आयव्हीएफचा अवलंब केला असून यासंदर्भात अद्याप सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबियांकडून माहिती देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे सिद्धूची आई चरण कौर या 58 वर्षांच्या आणि वडील बलकौर सिंग हे 60 वर्षांचे असून त्यांनी गर्भधारणेसाठी आयव्हीएफचा वापर केला असल्याचं समोर आलं आहे.
Sidhu Moosewala’s Mother Is Pregnant, To Welcome A Baby Soon: Report
It's true ..??#SidhuMooseWala #Viral pic.twitter.com/YWNJLR6pqL
— Ramsa Chaudhary (@Ramkishor_jaat_) February 27, 2024
2022 सालच्या मे महिन्यात गायक सिद्धू मुसेवालाची निर्घूणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ही हत्या करण्यात आल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर आता सिद्धू मुसेवालाच्या आईच्या गरोदरपणाच्या बातमीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
विधानसभेचे अध्यक्षपद किती महत्वाचे असते? नाना पटोले अन् काँग्रेसला ‘हिमाचल प्रदेश’ने दिले उत्तर
ही बातमी पसरताच सोशल मीडियात मीमचा पाऊस सुरू झाला आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून कमेंटचा वर्षाव करण्यात आला असून मीम्समध्ये बॉलीवूड चित्रपट ‘बधाई हो’ मधील चित्रफित देखील निदर्शनास आणून दिले आहे. या चित्रफितामध्ये अभिनेता आयुष्मान खुराना याने 25 वर्षीय पुरुषाची भूमिका केली असून त्याची आई गरोदर असल्याचे पाहून धक्का बसला आहे.
विक्रांतच्या ‘द साबरमती रिपोर्ट’चा धमाकेदार टिझर रिलीज, उलगडणार गोध्रा कांडाचं सत्य
दरम्यान, या बातमीमुळे 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला आयव्हीएफद्वारे मूल होऊ शकतात का? असे प्रश्न लोकांच्या मनात उपस्थिक केले जात आहेत. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. याला सर्वसामान्य भाषेत टेस्ट ट्यूब बेबी असेही म्हणतात. यामध्ये महिलेच्या अंडाशयातून अंडी बाहेर काढली जातात आणि पुरुषाच्या शुक्राणूसह फलित केले जातात. त्यानंतर तयार झालेला गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात ठेवला जातो. ज्या महिलांना नैसर्गिकरित्या मूल होऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे वरदान ठरले आहे.