Download App

Sikkim Flood : मृतांचा आकडा वाढला! 44 जणांचा मृत्यू, 142 बेपत्ता

Sikkim Flood : देशभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास (Sikkim Flood) सुरू झालेला असताना अनेक ठिकाणी तुफान पाऊस (Cloud Burst Sikkim) होत आहे. या मुसळधार पावसाचा सिक्कीमला जोरदार फटका बसला आहे. सिक्कीममध्ये (Heavy Rain in Sikkim) ढगफुटी झाल्याने अचानक पूरस्थिती निर्माण झाली असून उत्तरेकडील तीस्ता नदीच्या पाण्याची (Sikkim Flood) पातळी वाढली आहे. यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. अजूनही लष्कराचे 19 जवान बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. सिक्कीम सरकारने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार या पुरात मृत्यू झालेल्यांची संख्या आता 44 वर पोहोचली आहे. तर बेपत्ता झालेल्यांची यादी दुप्पट होऊन 142 वर पोहोचली आहे.

Cloud Burst Sikkim : सिक्कीममध्ये पुराचे थैमान! 14 जणांचा मृत्यू, 102 नागरिक बेपत्ता

प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच मदतकार्यही वेगाने सुरू करण्यात आले आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले जात आहे. तसेच अन्य आवश्यक उपाययोजनाही तत्परतेने केल्या जात आहेत. प्रशासनाने येथील सर्वांनाच सावधनतेचा आणि खबरदारी घेण्याचा इशारा दिल आहे.

सिक्कीममधील (Sikkim) पुरामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. येथील एक मोठा जलविद्युत प्रकल्प पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. रस्ते खराब झाले आहेत. लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारकडून मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले जात आहे. अन्य आवश्यक उपाययोजनाही केल्या जात आहेत.

महाराष्ट्रातील पर्यटक अडकले

सिक्कीम निसर्गसंपन्न राज्य आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रातूनही काही पर्यटक येथे गेले होते. मात्र ते अजूनही येथेच अडकून पडले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. अन्य राज्यांतील पर्यटकही येथे अडकून पडले आहेत. 

दारू सगळं काही नष्ट करते, मग ते आरोग्य असो वा चारित्र्य; गौतम गंभीरची खोचक टीका

Tags

follow us