Cloud Burst Sikkim : सिक्कीममध्ये पुराचे थैमान! 14 जणांचा मृत्यू, 102 नागरिक बेपत्ता

Cloud Burst Sikkim : सिक्कीममध्ये पुराचे थैमान! 14 जणांचा मृत्यू, 102 नागरिक बेपत्ता

Cloud Burst Sikkim : देशभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास (Cloud Burst Sikkim) सुरू झालेला असताना अनेक ठिकाणी तुफान पाऊस (Cloud Burst Sikkim) होत आहे. या मुसळधार पावसाचा सिक्कीमला जोरदार फटका बसला आहे. सिक्कीममध्ये (Heavy Rain in Sikkim) ढगफुटी झाल्याने अचानक पूरस्थिती निर्माण झाली असून उत्तरेकडील तीस्ता नदीच्या पाण्याची (Sikkim Flood) पातळी वाढली आहे. यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. सिक्कीम सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अचानक आलेल्या पुरामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 102 लोक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता नागरिकांत लष्कराच्या 23 जवानांचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त 26 जण जखमी झाले आहेत.

पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर चुंगथांग धरणातून (Sikkim Flood) पाणी सोडण्यात आले. याचा परिणाम म्हणून खालच्या भागात पाण्याची पातळी 15 ते 20 फुटांनी वाढली आहे. सिंगतमजवळ बारदांग येथे लष्कराची वाहने वाहून गेली. या दरम्यान जवळपास 102 नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. या लोकांचा शोध घेण्यासाठी परिसरात शोध मोहिम राबविण्यात येत आहे.

प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच मदतकार्यही वेगाने सुरू करण्यात आले आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले जात आहे. तसेच अन्य आवश्यक उपाययोजनाही तत्परतेने केल्या जात आहेत. प्रशासनाने येथील सर्वांनाच सावधनतेचा आणि खबरदारी घेण्याचा इशारा दिल आहे.

Cloud Burst Sikkim : सिक्कीममध्ये ढगफुटी! लष्कराचे 23 जवान झाले बेपत्ता

दरम्यान, इस्त्रोच्या (ISRO) टेम्पोरल सॅटेलाइट फोटो जारी केले आहेत. 17 सप्टेंबर आणि 28 सप्टेंबर रोजी घेतलेल्या फोटोत तलाावाची स्थिती दाखविण्यात आली आहे. बुधवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता काढलेल्या फोटोत तलावाचा आकार निम्म्यावर आल्याचे दिसत आहे. इस्त्रोने सांगितले की 17, 18 सप्टेंबर आणि ऑक्टोबर रोजी तलावाच्या क्षेत्रात बदल झाले आहेत. ढगफुटीमुळे तलावातील जवळपास 105 हेक्टर पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे अचानक पूर आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, सिक्कीममधील (Sikkim) पुरामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. येथील एक मोठा जलविद्युत प्रकल्प पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. रस्ते खराब झाले आहेत. लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारकडून मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले जात आहे. अन्य आवश्यक उपाययोजनाही केल्या जात आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube