Download App

Stock Market : शेअर बाजाराची संथ सुरुवात; निफ्टी 25,000च्या पातळीवर, टाटा मोटर्समध्ये मोठी घसरण

जागतिक बाजारातून मिळालेल्या सुस्त संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजारात पुन्हा घसरण झाली आहे.मिडकॅप निर्देशांकात वाढ झाली.

  • Written By: Last Updated:

Share Market Today : जागतिक बाजारातून मिळालेल्या सुस्त संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजारात (Share Market) पुन्हा घसरण झाली आहे. सुमारे 100 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स आज व्यवहार करत होता, तर निफ्टी सुमारे 150 अंकांनी घसरत होता, तर निफ्टी 25,015 च्या पातळीवर होता. निफ्टी बँक 51,115 च्या रेंजमध्ये व्यवहार करताना दिसली. मिडकॅप निर्देशांकात वाढ झाली.

बोलेरो-ट्रकचा भीषण अपघात! एकाच गावातील तीन युवक ठार; पाच जखमी

जागतिक संकेत काय आहेत?

आज देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक संकेत कमजोर दिसत आहेत. आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये विक्री दिसून येत आहे. याआधी मंगळवारी अमेरिकन बाजार संमिश्र बंद झाले होते. मंगळवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियलमध्ये 93 अंकांची घसरण झाली आणि तो 40736.96 च्या पातळीवर बंद झाला. NASDAQ Composite 141 अंकांनी वाढून 17,025.88 च्या पातळीवर बंद झाला. तर S&P 500 निर्देशांक सुमारे 24 अंकांनी वाढून 5495.52 च्या पातळीवर बंद झाला.

कोणते शेअर्स तेजीत?

सुरुवातीच्या व्यापारात, निफ्टीच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी वाढ एशियन पेंटमध्ये 1.22 टक्क्यांनी, आयटीसीमध्ये 0.92 टक्क्यांनी, बीपीसीएलमध्ये 0.88 टक्क्यांनी, नेस्ले इंडियामध्ये 0.87 टक्क्यांनी आणि हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये 0.79 टक्क्यांनी वाढ झाली.
याशिवाय टाटा मोटर्समध्ये 4.28 टक्के, ओएनजीसीमध्ये 2.05 टक्के, हिंदाल्कोमध्ये 0.95 टक्के, हीरो मोटोकॉर्पमध्ये 0.94 टक्के आणि एचडीएफसी लाईफमध्ये 0.83 टक्के घसरण दिसून आली.

शिखांना भारतात पगडी अन् कडं घालण्याची परवानगी आहे का?, राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा पलटवार

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास, निफ्टी ऑटोमध्ये 0.78 टक्क्यांनी सर्वात मोठी घसरण झाली. याशिवाय निफ्टी बँकेत 0.33 टक्के, निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्ये 0.28 टक्के, निफ्टी आयटीमध्ये 0.12 टक्के, निफ्टी मीडियामध्ये 0.29 टक्के, निफ्टी मेटलमध्ये 0.49 टक्के, निफ्टी प्रायव्हेट बँकेत 0.41 टक्के, निफ्टीमध्ये 0.61 टक्के, 0.61 टक्के निफ्टी रिअलमध्ये 0.61 टक्के वाढ झाली आहे. निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्समध्ये 0.08 टक्के आणि निफ्टी ऑइल अँड गॅसमध्ये 0.34 टक्के घसरण झाली. याशिवाय निफ्टी मिडस्मॉल हेल्थकेअरमध्ये 0.64 टक्के, निफ्टी हेल्थकेअर इंडेक्समध्ये 0.46 टक्के, निफ्टी पीएसयू बँकेत 0.06 टक्के, निफ्टी फार्मामध्ये 0.51 टक्के आणि निफ्टी एफएमसीजीमध्ये 0.48 टक्के वाढ दिसून आली.

follow us