Download App

नात्याला काळीमा! हातोड्यानं वार करत आई-वडिलांची केली निर्घृण हत्या, घटनेनंत मुलगा फरार

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा मोठा मुलगा लाला याच्याशी जगदीश आणि शिवप्यारी यांचा वाद झाला. यावेळी

  • Written By: Last Updated:

Young Man Murdered Parents : नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका तरुणाने आई-वडिलांची हातोड्याने वार करत निर्घृण हत्या केलीय. घटनेनंतर आरोपी (Murdered )तरुण घटनास्थळावरून फरार झाला. उत्तर प्रदेशातल्या मोहनलालगंज इथं ही घटना घडली. वृद्ध दाम्पत्याच्या लहान मुलाने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहेत. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

लखनऊच्या मोहनलालगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत जगदीश वर्मा हे त्यांच्या पत्नी शिवप्यारीसह राहत होते. जगदीश वर्मा हे ७० वर्षांचे होते. त्यांना दोन मुलं असून मोठ्या मुलाचं नाव ब्रिशकित उर्फ लाला तर लहान मुलाचं नाव देवदत्त असं आहे. गेल्या काही दिवसांपासून संपत्तीवरून मोठ्या मुलासोबत त्यांचा वाद सुरू होता. त्यातून घरात अधून मधून भांडणही व्हायचं.

मुंबईतील उंच इमारतीला भीषण आग; घटनेत २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर पाचजण गंभीर जखमी

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा मोठा मुलगा लाला याच्याशी जगदीश आणि शिवप्यारी यांचा वाद झाला. यावेळी लालाने हातोड्याने आई-वडिलांवर हल्ला केला. मुलाने केलेल्या हल्ल्यानंतर आई-वडील ओरडायला लागले. मात्र तरीही तो मारहाण करायचं थांबला नाही. जगदीश आणि शिवप्यारी हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यांच्या आवाजाने शेजारी घटनास्थळी आले आणि त्यांनी पोलिसांना या प्रकरणी माहिती दिली.

वृद्ध दाम्पत्याला जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं. तिथून डॉक्टरांनी दोघांनाही ट्रामा सेंटरला नेण्यास सांगितलं. पण उपचारावेळी दोघांचाही मृत्यू झाला. मोहनलालगंजचे एसीपी रजनीश वर्मा यांनी सांगितलं की, आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. लवकरच आरोपीला अटक केली जाईल.

follow us