मोठी बातमी! सोनम वांगचुक उपोषण सोडण्यास तयार…, सरकारपुढं ठेवल्या ‘या’ 3 अटी

दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. नुकताच सोनम वांगचुक यांनी एक ट्विट करत उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे.

Wangchuk

मोठी बातमी! सोनम वांगचुक उपोषण सोडण्यास तयार..., सरकारपुढं ठेवल्या 'या' 3 अटी

दिल्लीतील जंतरमंतर येथे सोनम वांगचुक (Wangchuk) यांचे उपोषण सुरू होतं. मात्र, त्यांना आता उपचारासाठी सफदरचंद रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांनी काही गंभीर आरोप केले. यासोबतच त्यांनी कोर्टात याचिका दाखल करत इतरत्र उपचारासाठी सोनम वांगचुक यांना हलवण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली होती. परंतु, कोर्टाने ती मागणी फेटाळली आहे. वांगचुक यांच्या तब्येतीविषयी रुग्णालयाकडून अधिकृत मेडिकल बुलेटिनही जारी करण्यात आले आहे.

दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. नुकताच सोनम वांगचुक यांनी एक ट्विट करत उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, यासोबतच त्यांनी काही अटीही ठेवल्या आहेत. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्यासाठी 3 अटी ठेवल्या आहेत. त्यामध्ये पहिली अट म्हटजे केंद्र सरकारने नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदल याची जबाबदारी घ्यावी. यासोबतच त्यांनी म्हटले की, मला आणि अभिजित दिपके यांना जर संसदेपर्यंत जाऊ दिले आणि तिथे पेपरफुटीच्या मुद्द्यात आवाज उठवण्याचे आश्वासन दिले तर मी माझे आमरण उपोषण मागे घेण्यास तयार आहे.

ही दुसरी स्वातंत्र्य चळवळ, संसदेवरील मोर्चा होणारच! रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा संदेश

मला जर माझ्या तब्येतीमुळे संसदेत जाता आलं नाही तर सफरगंज रूग्णालयात येऊन वरिष्ठ नेत्यांनी मला आश्वासन द्यावं. सोनम वांगचुक यांना सरकारकडून उचलून नेऊन उपचारासाठी दाखल करण्यात आले. सोनम वांगचुक यांना उपचारासाठी नेल्यावर या आंदोलनाची हवा निघेल, असा विश्वास सरकारला होता. मात्र, प्रत्यक्षात उलटे घडताना दिसत आहे. सोनम वांगचुक यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असतानाही आंदोलन सुरूच आहे.

अभिजित दिपके तिथे आहे. मध्यरात्रीपासूनच जंतर मंतरवर हालचालींना वेग आल्याचं बघायला मिळतंय. तेथील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद करण्यात आलीत. यासोबतच परिसरात जॅमर लावण्यात आलीत. सरकार काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत असल्याचं बोलले जातंय. आता सरकार सोनम वांगचुक यांच्या अटी मान्य करणार का? हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. जर सरकारने या अटी मान्य केल्या तर सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्यास तयार आहेत.

Exit mobile version