Download App

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर राहुल गांधीचं अमेरिकेत भाष्य; निवडणूक आयोगावरही थेट आरोप

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर २०२४ मध्ये झाली होती. या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक २३२ पेक्षा जास्त जागांवर

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi on Maharashtra Assembly Elections 2025 : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय नेते नेते राहुल गांधी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला आहे. (Gandhi) भारतातील निवडणूक प्रक्रिया गंभीर समस्या असल्याचा हल्ला करत त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं उदाहरण दिलं. ते बोस्टनमधील विद्यापीठात एका चर्चासत्रात बोलत होते.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मतदारांपेक्षा तरुण मतदान करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंतचा मतदानाचा डेटा दिला. परंतु, त्यानंतर संध्याकाळी ५:३० ते ७:३० वाजेपर्यंत जेव्हा मतदान संपायला हवं होतं, तेव्हा ६५ लाख मतदारांनी मतदान केलं. हा प्रकार अचंबित करणारा आहे. हे अशक्य आहे. कारण एका मतदाराला मतदान करण्यासाठी सुमारे ३ मिनिटे लागतात. मग तुम्ही गणना केली तर याचा अर्थ असा होईल की मतदार पहाटे २ वाजेपर्यंत रांगेत उभे होते. म्हणजेच महाराष्ट्रातील निवडणुकीत रात्रभर मतदान सुरु होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही असंही ते म्हणाले आहेत.

काँग्रेसच भाजप अन् RSS ला रोखू शकतो; अधिवेशनात राहुल गांधींचं मोठं विधान

राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत व्हिडिओ चित्रिकरणचा मुद्दाही मांडला. ते म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाला विचारले की, व्हिडिओग्राफी होत आहे का? त्यांनी केवळ व्हिडिओग्राफीला नकार दिला नाही, तर कायदाही बदलला, म्हणून आता तुम्ही व्हिडिओग्राफीची मागणी करू शकत नसल्याचं सांगितले. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला. त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, निवडणूक आयोगाने तडजोड केली आहे. हे आमच्यासाठी अगदी स्पष्ट झालं आहे. व्यवस्थेत खूप गडबड आहे. हे मी अनेकवेळा सांगितलं आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर २०२४ मध्ये झाली होती. या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक २३२ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला. भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २०, काँग्रेसला १६ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळाल्या होत्या.

follow us