विधानसभा निवडणूक प्रकरण, मुंबई उच्च न्यायालयाने बजावली CM फडणवीसांना नोटीस

Devendra Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानसभा 2024 निवडणूक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) नोटीस बाजावली आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 2024 (Nagpur South West Assembly Constituency) मध्ये झालेल्या विजयाला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नोटीस बजावली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका काँग्रेसचे नेते प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांनी दाखल केली आहे.
या निवडणुकीत प्रफुल्ल गुडधे (Prafulla Guddhe) फडणवीस यांच्याकडून 39,710 मतांनी पराभव झाले होते. काँग्रेसचे नेते प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांनी या याचिकेत निवडणुक प्रक्रियेत त्रुटी आणि भ्रष्ट पद्धतींचा आरोप करत फडणवीस यांचा विजय अवैध घोषित करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. गुडधे यांचे वकील पवन दहट म्हणाले की, न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठाने मुख्यमंत्री फडणवीस यांना नोटीस बजावली असून त्यांना या प्रकरणात 8 मेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती वकील पवन दहट यांनी दिली. तसेच गुडधे यांचे वकील दहत आणि एबी मून यांनी दावा केला की गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत अनेक अनिवार्य तरतुदींचे पालन करण्यात आले नव्हते.
तर दुसरीकडे उच्च न्यायालयाने नागपूर पश्चिम येथील भाजप आमदार मोहन मते आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघातील कीर्तीकुमार भांगडिया यांनाही अशाच प्रकारच्या निवडणूक याचिकांवर समन्स बजावले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का! संग्राम थोपटे पक्षाची साथ सोडणार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) सर्वांना धक्का देत 288 पैका 231 जागांवर बाजी मारली होती तर महाविकास आघाडीला (MVA) फक्त 46 जागा जिंकता आल्या होत्या. मात्र या निवडणुकीमध्ये ईव्हीएममध्ये (EVM) घोटाळा करण्यात आला असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.