Download App

टोकन वाटपाआधीच चेंगराचेंगरी, मृत्यूचा आकडाही वाढला; दुर्घटनेचं कारणही सापडलं..

टोकन घेण्यासाठी येथे टोकन केंद्र तयार केले आहेत. येथे टोकन वाटप सुरू होण्याआधीच धावपळ सुरू झाली.

Tirupati Stampede : आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिरात (Tirupati Temple) चेंगराचेंगरीच्या घटनेतील मयतांचा आकडा वाढला आहे. या घटनेत आणखी दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता हा आकडा सहापर्यंत पोहोचला आहे. जखमींवर तिरुपती येथील रुया रुग्णालयात (Ruya Hospital) उपचार सुरू आहेत. दर्शनाचे टोकन घेण्यासाठी हजारो भाविक वैकुंठ गेटवर (Vaikuntha Gate) रांगेत उभे होते मात्र अचानक चेंगराचेंगरी झाल्याने 6 जणांचा मृत्यू झाला.

ही घटना नेमकी कशामुळे घडली याचे कारण (Tirupati Stampede) आता समोर आले आहे. या दुर्घटनेत किमान 25 भाविक जखमी झाले आहेत. टोकन घेण्यासाठी येथे टोकन केंद्र तयार केले आहेत. येथे टोकन वाटप सुरू होण्याआधीच धावपळ सुरू झाली. त्यामुळे इतकी मोठी चेंगराचेंगरीची घटना घडली.

Tirupati Temple News : मोठी बातमी! तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, चार जणांचा मृत्यू

वैकुंठ एकादशीनिमित्त दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी येत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे येत असतात. यंदा 10 ते 19 जानेवारी दरम्यान वैकुंठ द्वार दर्शन होणार आहे. यासाठीच टोकन वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती. आजपासून टोकन वाटपाला सुरुवात होणार होती. परंतु, एक दिवस आधीच लोकांची गर्दी झाली होती. याच दरम्यान लोकांनी बैरागी पट्टीडा पार्क आणि एमजीएम स्कूल सेंटर येथे रांगा लावल्या होत्या. काही वेळातच येथे चार हजार लोकांची गर्दी झाली होती. याच दरम्यान येथे चेंगराचेंगरी झाली.

तिरुपती देवस्थानने मागितली माफी

या घटनेवर प्रतिक्रिया देताना टीटीडीचे चेअरमन बीआर नायडू म्हणाले, प्रशासनाच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडली हे आम्ही मान्य करतो. डीएसपीने एका भागात गेट उघडले आणि लोकांनी पळापळ सुरू केली. यामध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्यांतील एकाची ओळख पटली आहे. बाकीच्या पाच जणांची ओळख अजून पटलेली नाही. यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानमचे (टीटीडी) बोर्ड मेंबर भानू प्रकाश रेड्डी यांनी भाविकांची माफी मागितली आहे.

या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. पोलीस अधिकारी गर्दीचे नियंत्रण करताना दिसत आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी चेंगराचेंगरी सुरू झाली त्यावेळी एसपी सुब्बारायडू स्वतः टोकन वितरण केंद्रांची व्यवस्था पाहत होते. जिल्हाधिकारी डॉ. एस. वेंकटेश्वर आणि संयुक्त जिल्हाधिकारी शुभम बन्सल यांनी रुग्णालयाला भेट दिली आणि जखमींची माहिती घेतली.

follow us