Stock Market: येत्या 22 जानेवारी अयोध्येतील राम मंदिरात Ram Mandirr) रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी केंद्र सरकारने अर्धा दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तर महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे सोमवारच्या दिवशी शेअर बाजार (stock market>) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर आता उद्या शनिवारी दिवसभर शेअर बाजाराचे व्यवहार होणार आहेत.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) हे सोमवारी बंद राहणार आहे. तर शनिवारी केवळ दोन तास बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर झाला होता. परंतु नव्या आदेशानुसार शनिवारी पूर्ण दिवस सकाळी सव्वा नऊ ते दुपारी साडेतीनपर्यंत शेअर बाजारातील व्यवहार होणार आहेत. शनिवारी व रविवारी दोन दिवस बाजार बंद राहतो. परंतु पहिल्यांदा शनिवारही बाजारात व्यवहार होणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा दिवस महत्त्वाचा राहणार आहे.
लालू-तेजस्वींच्या अडचणीत वाढ! ईडीने पाठवली नोटीस, 29 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश
केंद्र सरकारच्या एका आदेशानुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या, ग्रामीण बँका सोमवारी अर्धा दिवस सुरू राहणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्यातील सरकारी कार्यालये, शाळा बंद राहणार आहेत. त्यानंतर शेअर बाजार दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ED Notice : रोहित पवारांचा ईडीला आग्रह, दोन दिवस आधीच येतो
महाराष्ट्राबरोबर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, उत्तराखंड, छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, आसाम या राज्यांनीही रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.