Download App

जागतिक बाजारातील मंदीच्या संकेतांचा परिणाम; भारतीय शेअर बाजार आज घसरणीसह उघडला

भारतीय शेअर बाजार जागतिक बाजारातील मंदीच्या संकेतांदरम्यान आज घसरणीसह उघडला. सेन्सेक्स 100 अंकांच्या घसरणीसह उघडला.

  • Written By: Last Updated:

Stock Market Update : भारतीय शेअर बाजार जागतिक बाजारातील मंदीच्या संकेतांदरम्यान आज घसरणीसह उघडला. सेन्सेक्स 100 अंकांच्या घसरणीसह 80,700 च्या पातळीवर व्यवहार करत होता. (Stock Market ) तर निफ्टी 30 अंकांच्या घसरणीसह 24,700 च्या खाली उघडला. बँक निफ्टी देखील 100 हून अधिक अंकांनी घसरत होता आणि निर्देशांक 50,600 च्या वर होता. Divi’s Lab, L&T, Bharti Airtel, Tata Motors हे शेअर्स तेजीत होते. तर श्रीराम फायनान्स आणि एचडीएफसी बँक घसरले आहेत.

जगातील सर्वात वयोवृद्ध महिला मारिया ब्रान्यास यांचं निधन; 117 वर्ष 168 दिवसांनी घेतला अखेरचा श्वास

शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग

आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये विक्री दिसून येत असताना याआधी मंगळवारी अमेरिकन बाजारांमध्ये सुरू असलेल्या तेजीला ब्रेक लागला. BSE सेन्सेक्स ५४ अंकांनी घसरून ८०,७४७.९८ वर उघडला. त्याचवेळी NSE निफ्टीने ०.०७% घसरणीसह २४,६८०.५५ वर सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्समधील ३० पैकी १९ समभागांमध्ये तेजीचा कल दिसून येत आहे.

बदलापूर घटनेनंतर राज ठाकरेंचे मनसैनिकांना थेट आदेश; म्हणाले, आरोपीला

जागतिक संकेत काय सांगतात

भारतीय बाजारांसाठी जागतिक बाजारातून नरमाईचे संकेत मिळत आहेत. अमेरिकन बाजारांमध्ये सलग साथ दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीच्या ट्रेंडला ब्रेक लागला असून यूएस मार्केटमध्ये किंचित सावधगिरी दिसून आली. जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारांची आज सपाट सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसंच, गिफ्ट निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदच्या तुलनेत सुमारे १२ अंकांनी खाली २४,६९५ वर व्यवहार करत होता.

follow us