Ritesh Agrawal Success Story : 2012 साली दिल्लीतील कडकडत्या थंडीत एक 18-19 वर्षांचा मुलगा मस्जिज मोठा रोड जवळ बसून निरीक्षण करत होता. त्याच्या खिशात केवळ 30 रूपये होते. पोट आणि खिसा दोन्ही रिकामं व्हायला लागलं होतं. त्याला वाटत होतं घरी निघून जावं. पण त्या स्वप्नाचं काय होणार? ज्यासाठी तो ओडिसाहून दिल्लीत आला होता. त्यासाठी त्याने रस्त्यावर सिम कार्ड विकले. तर आज तोच मुलगा जगातील सर्वात तरूण अब्जाधिशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. त्याचं नाव आहे ओयो हॉटेल्सचे संस्थापक रितेश अग्रवाल. (Success Story of OYO hotels founder Ritesh Agrawal)
Ahmednagar: गौतमी पाटील अन् सुजय विखे पाटलांसमोर चिमुरडीने केलं मार्केट जाम! पाहा व्हिडिओ
रितेश अग्रवाल यांच्या ओयो हॉटेल्सचं जाळ आज जगातील 80 देशांच्या 800 शहरांमध्ये पसरलं आहे. सध्या ते चर्चेत आले आहेत ते त्यांनी आपल्या कंपनीतून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नोकरी मागितली आहे. त्यांच्या या भूमिकेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. तर त्यांच्या या अत्यंत कमी वयात मिळवलेल्या यशामुळे त्यांना लोक भविष्यातील गौतम अदानी देखील म्हणत आहे. मात्र त्यांनी मिळालेलं हे यश इतकं सहज मिळालेलं नाही.
Chandrayaan-3 : इस्त्रोचे शास्त्रज्ञ तिरुपतीच्या चरणी; प्रतिकृती मॉडेलसह मिशन यशस्वीतेसाठी प्रार्थना
रितेश यांचा जन्म 1993 मध्ये ओडिसातील मारवाडी परिवारात झाला मध्यम वर्गीय परिवारात जन्मलेल्या रितेशचे पालकांची इच्छा होती की, त्याने इंजिनिअर व्हावं. त्यासाठी त्याला कोटा येथे शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. रितेश 10 वी नंतर कोटाला गेला खरा पण, त्याचं मन लागत नव्हतं. मग त्याने दिल्ली गाठली. त्याला वाटत होतं नोकरी नाही तर त्याला व्यावसाय करायचं होता.
मात्र दिल्लीत राहणं साप नव्हतं. राहण्या-खाण्यासाठी पैसे नव्हते तर व्यावसायासाठी कुठून आणणार. पण तो खचला नाही. त्याने रस्त्यावर सिम कार्ड विकले. तेथूनच त्याच्या व्यावसायिक होण्याचा प्रवास सुरू झाला. 2013 ला रितेशची निवड थिएल फेलोशिपसाठी झाली. त्यात त्याला 75 लाख रूपये मिळाले. त्यातून त्याने ओयो रूम्सची सुरूवात केली. त्यासाठी मोठा अभ्यास केला. तेव्हा कंपनीच नाव ओरेवल स्टेज ठेवलं. या प्लेटफॉर्मच्या मदतीने फायदेशीर दरात सहज हॉटेल बुकिंग सुविधा दिली.
कंपनी सुरू केली. पण यश मिळत नव्हतं. त्यामुळे कंपनीचं नाव बदलंलं आणि ओयो रूम्स ठेवलं. 2013 मध्ये सुरू झालेली ही कंपनी अवघ्या 8 वर्षांत 75 हजार कोटींची बनली. Oyo चा व्यवसाय 80 देशांमधील 800 शहरांमध्ये पसरला आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या दरात मानक खोल्या आणि जोडप्यासाठी अनुकूल पर्याय देते. याच कारणामुळे ती लोकांची पहिली पसंती ठरत आहे. अग्रवाल आज जगातील सर्वात तरूण अब्जाधिशांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत.