Download App

Assembly Election 2023 : केसीआरची ऑफर नाकारली; काँग्रेसला जिंकून देण्यामागे डोकं कुणाचं ?

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Sunil Kanugolu : लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल असलेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly election 2023) भाजपने बाजी मारलीय. चार राज्यांपैकी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड हे तिन्ही राज्ये भाजपने बहुमताने जिंकली. हिंदी बेल्टमध्ये एकही राज्य जिंकू न शकणाऱ्या काँग्रेसने मात्र तेलंगणात कमाल केलीय. के. चंद्रशेखर राव (KCR) यांची दहा वर्षांच्या सत्तेला काँग्रेसने सुरुंग लावत तेलंगणा जिंकले. इतर राज्यात मोठा करिश्मा करू न शकलेल्या काँग्रेसला (Congress) तेलंगणात राजकीय रणनितीकाराने तारलेय. कर्नाटकापाठोपाठ तेलंगणात काँग्रेसला एेतिहासिक विजय मिळवून देणारे व्यक्ती म्हणजे सुनील कानुगोलू (Sunil Kanugolu ) होय. त्यांच्याविषयी जाणून घेऊया…

Rajasthan Election : राजकुमारीची जादू कायम! दणदणीत विजयासह आता CM पदासाठी शर्यतीत

चाळीस वर्षीय सुनील कानुगोलू हे कर्नाटकामधील बेल्लारी येथील रहिवासी आहेत. त्यांनी चेन्नईतून शिक्षण घेतले. त्यानंतर उच्च शिक्षण अमेरिकेत घेतले. अमेरिकेतून आल्यानंतर ते रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या टीममध्ये दाखल झाले. 2014 लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक कॅम्पनेमध्येही कानुगोलू हे होते. परंतु प्रशांत किशोर हे भाजपपासून बाजूला झाले. तर कानुगोलू हे भाजपबरोबर राहिले. तर 2017 साठी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसाठी रणनितीकार कानुगोलू हेच राहिले. भाजपला उत्तर प्रदेश जिंकून देणाऱ्या कानुगोलू यांनी 2019 मध्ये भाजपचे काम बंद केले. त्यानंतर डीएमके, आपसाठी त्यांनी रणनिती आखली होती. 2021 साठी तामिळनाडू निवडणुकीसाठी एआयएडीएमकेसाठी काम केले. कर्नाटकमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळवून देण्यामागे कानुगोलू यांचीही रणनिती होती. कर्नाटक जिंकून देणारे कानूगोलू हे मुख्यमंत्री सिद्धरमय्या खास झाले. ते मुख्यमंत्र्यांचे सल्लागार झाले. त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळाला. राहुस गांधी यांची भारत जोडो यात्रेतही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

कानुगोलू हे काँग्रेसचे काम करण्यापूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही त्यांच्याशी संपर्क साधला होता. केसीआर यांच्या फार्महाऊसवर दोघांच्या बैठकाही झाल्या होत्या. परंतु कानुगोलू यांनी केसीआर यांच्यासाठी काम करण्यास नकार दिला. त्यानंतर काहीच दिवसात ते काँग्रेसच्या निवडणूक प्रचार कमिटीचे अध्यक्ष झाले आणि कर्नाटक आणि तेलंगणा दोन्ही राज्यांसाठी काम सुरू केले. तेलंगणा काँग्रेसमध्ये गट-तट होते. कानुगोलू यांनी काँग्रेसला एकत्र आणले. काँग्रेस चांगली कामगिरी करू करत होती. त्याची भिती मुख्यमंत्री केसीआर यांना जाणवू लागले. केसीआर यांनी कानुगोलू यांच्यावर पोलीस कारवाई सुरू केली. त्यांच्या कार्यालयावर छापे मारले. परंतु कानुगोलू घाबरले नाहीत. त्यांनीच आता केसीआरला मोठा झटका दिला आहे.

कानुगोलू यांना तेलंगणा राज्यात काँग्रेसकडून फ्री हॅण्ड देण्यात आला होता. तेथे त्यांनी चमत्कार करून दाखविला आहे. पण मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि कमलनाथ यांनी तो फ्री हॅण्ड दिला नाही, असे बोलले जात आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज