भारतीयांच्या ठेवी पन्नास टक्क्यांनी वाढल्या ! स्विस बँकांची नवी माहिती; या बँकेत भारताचे किती पैसे ?

Swiss Banks-स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये भारतीय नागरिक आणि संस्थांशी संबंधित निधी किंवा ठेवी 2025 मध्ये 8 टक्क्यांनी घटल्या आहेत.

Swiss Bank

Swiss Bank

Swiss Banks Indian Money: भारतातील पैसा विदेशात जातो. हा पैसे स्विस बँकेत ठेवला जातो. देशातील मोठे उद्योगपती, राजकारणी यांचा पैसे ठेव स्वीस बँकेत ठेवला जातो. त्यामुळे स्वीस बँकेच्या (Swiss Banks) अहवालाकडे देशवासियांचे लक्ष लागलेले असते. स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये भारतीय नागरिक आणि संस्थांशी संबंधित निधी किंवा ठेवी 2025 मध्ये 8 टक्क्यांनी घटल्या आहेत. 3.25 अब्ज स्विस फ्रँक म्हणजे सुमारे 36,793 कोटी रुपये इतका राहिला आहे. पण याच काळात भारतीय वैयक्तिक आणि संस्थात्मक ग्राहकांच्या खात्यांमधील थेट ठेवी 50 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत, हे विशेषय. त्यामुळे या आकडेवारीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

स्विस नॅशनल बँकेने (SNB) गुरुवारी आकडेवारी जाहीर केली आहे. 2025 अखेरीस स्विस बँकांकडे भारतीय ग्राहकांशी संबंधित एकूण 3,250.5 दशलक्ष स्विस फ्रँक इतकी रक्कम होती. ही रक्कम म्हणजे स्विस बँकांची भारतीय ग्राहकांप्रती असलेली आर्थिक जबाबदारी आहे.

आगे आगे देखो होता है क्या, 13 ते 14 आमदार फुटणार असल्याच्या संतोष बंगारांच्या दाव्याने खळबळ


सर्वाधिक रक्कम बँकांमार्फतच

या एकूण रकमेपैकी 2.6 अब्ज स्विस फ्रँक ही रक्कम “बँकांना देय असलेली रक्कम” (Amounts Due to Banks) या स्वरूपात होती. म्हणजेच इतर बँका किंवा वित्तीय संस्थांच्या माध्यमातून ही रक्कम स्वित्झर्लंडमध्ये ठेवण्यात आली होती. या वर्गवारीतील निधीमध्ये यावर्षी सुमारे 15 टक्क्यांची घट झालीय.

UPI ने जग जिंकलं, पण बँकांची कागद-पेनची सवय सुटेना; SBI ने खर्च केले तब्बल 986 कोटी


ग्राहकांच्या ठेवींमध्ये मोठी वाढ

दुसरीकडे, वैयक्तिक आणि संस्थात्मक ग्राहकांच्या खात्यांमधील थेट ठेवी 2025 मध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाढून 524 दशलक्ष स्विस फ्रँक म्हणजे सुमारे 6,000 कोटी रुपये झाल्या आहेत. मात्र, ही वाढ लक्षणीय असली तरी ती स्विस बँकांमधील भारतीयांशी संबंधित एकूण निधीच्या केवळ 16 टक्के इतकीच आहे.


ट्रस्ट आणि गुंतवणुकीतील रक्कम कमी

ट्रस्टमार्फत ठेवलेली रक्कम 2024 मधील 41 दशलक्ष स्विस फ्रँकवरून 18.6 दशलक्ष स्विस फ्रँकपर्यंत घसरलीय. त्यात सुमारे 55 टक्के घट झाली आहे.
तसेच, बाँड्स, सिक्युरिटीज आणि इतर आर्थिक साधनांमधील गुंतवणूकही 135 दशलक्ष स्विस फ्रँकवरून 105.7 दशलक्ष स्विस फ्रँकपर्यंत कमी झाली आहे.
यावरून असे दिसते की, 2025 मध्ये भारतीय ग्राहकांच्या थेट बँक ठेवींमध्ये वाढ झाली असली तरी ट्रस्ट आणि गुंतवणूक स्वरूपातील निधी कमी झाला आहे. एकूण भारतीय निधीचा मोठा भाग अजूनही इतर बँकिंग आणि वित्तीय संस्थांमार्फतच स्विस बँकांमध्ये ठेवला जातो.


BIS च्या आकडेवारीत काय दिसते?

भारतीयांच्या स्विस बँकांतील थेट ठेवींची स्वतंत्र नोंद बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स (BIS)ठेवते. भारत आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशांकडून ही आकडेवारी अधिक विश्वासार्ह मानली जाते. BIS नुसार, 2025 मध्ये भारतीय व्यक्तींच्या थेट ठेवी 20 टक्क्यांनी वाढून 89.73 दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे 780 कोटी रुपये झाल्या आहेत. 2024 मध्येही या ठेवींमध्ये 6 टक्क्यांची वाढ झाली होती. त्यापूर्वी सलग तीन वर्षे घट झाली होती. 2007 मध्ये हीच रक्कम 2.3 अब्ज डॉलरपेक्षा अधिक होती. त्यामुळे दीर्घकालीन चित्र पाहता भारतीयांच्या थेट ठेवींमध्ये मोठी घट झाली आहे.


एकूण भारतीय निधीचा कल काय?

2025 मध्ये भारतीयांशी संबंधित एकूण निधी 3.25 अब्ज स्विस फ्रँक इतरा राहिला, तर 2024 मध्ये तो 3.5 अब्ज स्विस फ्रँक होता. 2021 मध्ये 3.83 अब्ज स्विस फ्रँक इतका राहिला आहे. हा 14 वर्षांतील उच्चांक आहे. तर 2006 मध्ये 6.5 अब्ज स्विस फ्रँक म्हणजे सर्वाधिक होय. हाच आकडा 2006 मध्ये प्रचंड म्हणजे 6.5 अब्ज स्विस फ्रँक इतका सर्वाधिक होता. गेल्या दोन दशकांचा विचार केला तर स्विस बँकांमधील भारतीय निधीचा एकूण कल घटता राहिला आहे. मात्र, 2011, 2013, 2017, 2020, 2021, 2022, 2023 आणि 2024 या काही वर्षांत वाढही नोंदवण्यात आली आहे.


ही रक्कम म्हणजे ‘काळा पैसा’ नाही

स्विस नॅशनल बँकेने स्पष्ट केले आहे की ही आकडेवारी बँकांनी अधिकृतपणे सादर केलेल्या माहितीनुसार तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या रकमेला भारतीयांचा ‘काळा पैसा’ असे म्हणता येणार नाही. याशिवाय भारतीय, एनआरआय किंवा इतर व्यक्तींनी तिसऱ्या देशातील कंपन्या किंवा संस्थांच्या माध्यमातून स्विस बँकांमध्ये ठेवलेला निधी या आकडेवारीत समाविष्ट नाही. स्विस अधिकाऱ्यांचेही सातत्याने म्हणणे आहे की, स्वित्झर्लंडमधील भारतीयांची प्रत्येक मालमत्ता बेकायदेशीर किंवा काळा पैसा आहे, असे मानणे चुकीचे आहे.


भारत-स्वित्झर्लंड कर माहितीची देवाणघेवाण

भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात Automatic Exchange of Information (AEOI) व्यवस्था 2018 पासून लागू आहे. या व्यवस्थेनुसार सप्टेंबर 2019 पासून भारतीय खातेदारांची आर्थिक माहिती दरवर्षी भारतीय कर विभागाला दिली जाते. भारताने एखाद्या आर्थिक गैरव्यवहाराचे प्राथमिक पुरावे (Prima Facie Evidence) सादर केल्यास स्वित्झर्लंड त्या प्रकरणाशी संबंधित माहितीही उपलब्ध करून देते. अशा शेकडो प्रकरणांमध्ये दोन्ही देशांदरम्यान माहितीची देवाणघेवाण झाली आहे.

स्विस बँकांमधील निधीच्या बाबतीत भारताचे स्थान
स्विस बँकांमध्ये सर्वाधिक निधी ठेवणाऱ्या देशांच्या यादीत भारत 2024 मध्ये 48व्या क्रमांकावर होता. 2025 मध्ये भारत 46व्या स्थानावर पोहोचला.
2024 अखेरीस भारतीय ग्राहकांची स्विस बँकांमधील एकूण मालमत्ता 1.5 अब्ज स्विस फ्रँक इतकी होती, जी त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत सुमारे 6 टक्क्यांनी कमी होती.

Exit mobile version