CM Stalin Appeals To Newlyweds Have Children Immediately : तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी एक अजब फर्मान काढल्याचं समोर आलंय. (Tamilnadu) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (CM Stalin) यांनी लोकांना तात्काळ मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलंय. त्यांनी म्हटलंय की, कुटुंब नियोजनाची यशस्वी अंमलबजावणी तामिळनाडूसाठी तोट्याचा सौदा ठरला आहे. लोकसंख्येवर आधारित सीमांकनामुळे तामिळनाडूच्या राजकीय प्रतिनिधित्वावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा स्टॅलिन यांनी राज्यातील लोकांना दिला.
मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी जनतेला तात्काळ मुलं जन्माला घालण्याचं (Tamilnadu News) आवाहन केलंय. राज्याच्या यशस्वी कुटुंब नियोजन उपायांमुळे आता मोठी अडचण निर्माण झालंय, असं त्यांनी म्हटलंय. लोकसंख्येवर आधारित सीमांकन तामिळनाडूच्या राजकीय प्रतिनिधित्वावर परिणाम करू शकते, असा इशारा त्यांनी दिला.
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अन्यथा… रविकांत तुपकरांकडून आंदोलनाचा बॉम्ब फोडण्याचा इशारा
स्टॅलिनने राज्यातील रहिवाशांना त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याचं आवाहन केलंय. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, केंद्र सरकार 2026 मध्ये लोकसभेच्या जागांचे सीमांकन करू शकते. बदलत्या लोकसंख्येच्या आकडेवारीबद्दल बोलताना ते म्हणाले, पूर्वी आपण वेळ घ्या, विचार करा आणि नंतर योग्य विचार करून मुले जन्माला घाला. पण आता परिस्थिती बदलली आहे आणि आपण ताबडतोब मुले जन्माला घालण्याबद्दल बोलले पाहिजे.
लोकसंख्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे सीमांकन लागू करण्याच्या शक्यतेशी स्टॅलिन यांनी गंभीर चिंता व्यक्त केलीय. ते म्हणाले की, आम्ही कुटुंब नियोजन यशस्वीरित्या राबवलं. आता आम्ही गंभीर परिस्थितीचा सामना करत आहोत. राज्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामावर प्रकाश टाकताना, स्टॅलिन यांनी आपली भूमिका बळकट करताना म्हटलंय की, म्हणून मी तुम्ही वेळ घ्या पण तुमच्या मुलाला ताबडतोब जन्म द्या.
अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, औरंगजेब म्हणजे क्रुरकर्मा…; DCM शिंदे संतापले
सीमांकनाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी स्टॅलिन यांनी 5 मार्च रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वांनी एकत्र येऊन तामिळनाडूच्या भविष्याचा विचार करावा, अशी इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले की, ते एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. जिथे त्यांना त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी निषेध करावा लागला. स्टॅलिन यांनी म्हटलंय की, जर लोकसंख्येच्या आधारावर सीमांकन केले तर राज्यातील जागा 39 वरून 31 पर्यंत कमी होतील.