Download App

Video : टाटा समूहाच्या आयफोन प्लांटला भीषण आग; 100 हून अधिक पोलिस तैनात

कंपनीच्या मोबाईल फोन एक्सेसरीज पेंटिंग युनिटमध्ये पहाटे साडेपाच वाजता आग लागली. आग लागल्यानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते

  • Written By: Last Updated:

Tata Factory Fire : टाटा ग्रुपच्या एका प्लांटला भीषण आग लागली आहे. तामिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्यातील होसूरजवळील टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्लांटमध्ये ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. (Tata ) या टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्लांटमध्ये आज सकाळी आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी आणि मदतीसाठी हजर आहेत. आग लागली तेव्हा प्लांटमध्ये अनेक कर्मचारी ड्युटीवर होते. कंपनीच्या निवेदनात म्हटलं आहे की, आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांचं रक्षण करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करू. आगीचे कारण तपासले जात आहे.

कोणीही जखमी नाही

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या मोबाईल फोन एक्सेसरीज पेंटिंग युनिटमध्ये पहाटे साडेपाच वाजता आग लागली. आग लागल्यानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. कर्मचारी व स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेर काढण्यासाठी सात अग्निशमन गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. आतापर्यंत कोणीही जखमी झाले नाही. ही दिलासादायक बाब आहे.

NCP Symbol Case : विधानसभेपूर्वी अजित पवारांना धक्का, मिळणार नवीन चिन्ह?

आग लागली तेव्हा पहिल्या शिफ्टमध्ये सुमारे 1500 कर्मचारी ड्युटीवर होते. Tata Electronics Private Limited (TEPL) च्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील होसूर येथील आमच्या प्लांटमध्ये आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आगीचे कारण तपासले जात आहे आणि आम्ही आमचे कर्मचारी आणि इतर भागधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करू.

परिसर रिकामा करण्याचे आदेश

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वसनाचा त्रास होत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात येत आहे. 100 हून अधिक पोलिसांचे पथक येथे तैनात करण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीचा परिसर रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयफोनसाठी अनेक उपकरणे तयार करणाऱ्या या कंपनीत कर्मचाऱ्यांची संख्या 4500 आहे. ही कंपनी 500 एकरवर पसरलेली आहे.

follow us