Download App

TCS चा नफा वाढला पण कर्मचाऱ्यांची संख्या घटली…कारण काय?

TCS : टाटा समुहाची सर्वात मोठी कंपनी टाटा कन्स्लटंन्सी सर्व्हिस कंपनीच्या (TCS) नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली पण कर्मचाऱ्यांची संख्या घटली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या घटण्याची ही मागील वर्षातील पहिलीच वेळ आहे. जागतिक मंदी, अर्थिक अडचणींच्या कारणामुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचं तज्ज्ञांकडून बोललं जात आहे.

Rahul Narvekar : SC ने गोगावलेंचा अवैध ठरवलेला व्हीप विधानसभा अध्यक्षांनी वैध कसा ठरवला?

TCS (Tata Consultancy Services) कंपनीने 9 जानेवारी 2023 रोजी डिसेंबर तिमाहीच्या निकालांमध्ये चांगला नफा कमावला आहे. TCS ने तिसऱ्या तिमाहीत 4 टक्के निव्वळ नफा कमवला असून हा नफा आता 10,846 कोटी रुपये झाला आहे. TCS चा एकत्रित महसूल 5.3 टक्क्यांनी वाढून 58,229 कोटी रुपये झाला असून आपल्या शेअर्सधारकांना लाभ देण्यासाठी, TCS ने प्रति शेअर रु 8 च्या अंतरिम लाभांशासह 67 रुपये प्रति शेअर लाभांश देण्याचं घोषित केलं आहे.

भाजपने डोळे दाखवताच अजितदादा नरमले; चंद्रकांतदादांनी प्रस्तावित केलेली सर्व कामे मंजूर

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने 9 जानेवारी 2023 रोजी जाहीर केलेल्या डिसेंबर तिमाही निकालांमध्ये म्हटले की, कर्मचार्‍यांची संख्या 2,197 ने कमी झालीयं. आता TCS मध्ये एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 6,13,974 इतकी आहे. मागील 10 तिमाहीत पहिल्यांदाच डिसेंबर तिमाहीत TCS च्या कर्मचार्‍यांच्या संख्येत घट झाल्याने धक्का बसला आहे. याआधी सप्टेंबर तिमाहीत TCS ने 9,840 कर्मचारी जोडले गेले होते. TCS कर्मचार्‍यांची संख्या कमी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत.

कंपनीत आर्थिक वातावरणातील ट्रेंडमुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी होऊ शकते. तर रिक्त पदे न भरणे हे दुसरे कारण मानले जात आहे. युरोपमधील मंदीची परिस्थिती लक्षात घेता, टीसीएस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यावर भर देत नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही तिमाहीमध्ये नव्या टॅलेंटवर फोकस करण्यात आला असून त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचं काम सुरु असल्याचं टीसीएसचे अधिकारी मिलिंद लक्कड यांनी सांगितलं आहे.

follow us