Download App

विषय हार्ड! ‘या’ कंपनीने दिवाळी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना दिली चक्क Mercedes-Benz कार

Chennai Company Gifts Mercedes-Benz Cars : पुढील महिन्यात आपल्या देशात  दिवाळी मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरी केली जाणार आहे. तर दुसरीकडे

  • Written By: Last Updated:

Chennai Company Gifts Mercedes-Benz Cars : पुढील महिन्यात आपल्या देशात  दिवाळी मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरी केली जाणार आहे. तर दुसरीकडे प्रत्येक कंपनी दिवाळी निमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून काही आर्थिक मदत देत असते किंवा काही भेटवस्तू देत असते. मात्र कधी तुम्ही हे ऐकले आहे का? कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून चक्क मर्सिडीज कार (Mercedes-Benz Cars) दिली आहे.  होय, चेन्नई येथील एका स्ट्रक्चरल डिझाईन कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून महागड्या गाड्या भेट दिल्या आहेत. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोराने सुरु आहे.

माहितीनुसार, टीम डिटेलिंग सोल्युशन्सचे (Team Detailing Solutions) एमडी श्रीधर कन्नन (Sridhar Kannan) यांनी त्यांच्या वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांना 28 कार आणि 29 बाइक्स बोनस म्हणून दिल्या आहे. या कंपनीने कर्मचाऱ्यांना कार आणि दुचाकींचे वाटप केले आहे. ज्यामध्ये  Mercedes-Benz, Tata Nexon, Tigur, Maruti Suzuki Swift, Ertiga, Brezza, Hyundai i10, Kia Seltos यासह 28 कारचा समावेश आहे. तर दुसरीकडे कंपनीने TVS Jupiter 110, Suzuki Access 125 आणि TVS Rider 125 सारख्या 29 बाइक्स बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना दिले आहे.

कंपनीने 9 वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना कार दिले आहे तर 7 वर्षे पूर्ण झालेल्यांना बाइक्स दिले आहे. याबाबत माहिती देताना टीम डिटेलिंग सोल्युशन्सचे एमडी श्रीधर कन्नन यांनी सांगितले की, आमची कंपनी 19 वर्षांपूर्वी 4 कर्मचाऱ्यांसह सुरू झाली होती. आज आमच्या कंपनीत 180 कर्मचारी आहेत. आम्ही सर्व कर्मचाऱ्यांची लाईफ स्टाईल सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. कार आणि बाइकसह कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना लग्नानिमित्त 1 लाख रुपये रोख देण्याचे आश्वासनही दिले आहे. यापूर्वी ही रक्कम 50 हजार रुपये होती.

लाखो रुपये खर्च

कंपनीने कर्मचाऱ्यांना कार आणि बाइक भेट देण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. या यादीत समाविष्ट असलेल्या टाटा टिगोर सेडानबद्दल बोलायचे तर, तिची किंमत 6 लाख ते 9.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. मारुती सुझुकी स्विफ्टची किंमत 6.49 ते 9.60 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. ही भारतातील सर्वाधिक मागणी असलेली हॅचबॅक कार आहे. ही 24.80 ते 32.85 kmpl चा मायलेज देते. यात 9-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह अनेक जबरदस्त फीचर्स आहे.

उद्धव ठाकरेंना पुन्हा ह्रदयविकाराचा त्रास; रिलायन्स रुग्णालयात दाखल

तर TVS Jupiter 110 ची किंमत 73,700 ते 87,250 रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. यात 113 सीसीचे पेट्रोल इंजिन आहे. हे 60 किमी प्रति लीटर पर्यंत मायलेज देते. याशिवाय या लिस्टमध्ये अनेक कार आणि बाइक्सचा समावेश आहे ज्यांची किंमत लाखांमध्ये आहे.

follow us