उद्धव ठाकरेंना पुन्हा ह्रदयविकाराचा त्रास; रिलायन्स रुग्णालयात दाखल

उद्धव ठाकरेंना पुन्हा ह्रदयविकाराचा त्रास; रिलायन्स रुग्णालयात दाखल

Udhav Thackeray News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांना पुन्हा ह्रदयविकाराचा त्रास झाल्याची माहिती समोर आलीयं. ह्रदविकाराच्या झटक्यामुळे त्यांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे. याआधी त्यांना 2014 साली ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना ह्रदयविकाराचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलंय. दरम्यान, सध्या रुग्णालयात त्यांची तपासणी सुरु असून ह्रदयातील ब्लॉकेजमुळे त्यांची अॅंजिओग्राफी होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईतील NRI कॉम्प्लेक्सच्या १७ व्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाला आग विझविण्यात यश

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचंच वेध लागलंय. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक सुरु असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर निवडणूक आयोगाकडून उद्या राज्याच्या विधानसभा निवडणूका जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election : विधानसभेसाठी राहुल गांधी ॲक्शन मोडमध्ये, ‘या’ नेत्यांसोबत करणार मिटिंग

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये यंदाच्या निवडणुकीत चुरशीची लढत होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून रणनीती आखण्यात येत असतानाच उद्धव ठाकरे यांना रुग्णालयात दाखल केलेलं असल्याने उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय.

नूकताच पार पडलेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं होतं. धारावी जमीनीचा मुद्दा, शिंदे गटाची गद्दारी, विविध प्रकल्पांवरुन उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केल्याचं दिसून आले होते.

काही महिन्यांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी दिल्लीदौरा केला होता. या दौऱ्यामध्ये त्यांनी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. या भेटीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. याच दौऱ्यात राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुख्यंमत्रिपदावर चर्चा झाली असल्याचं दावा पत्रकार आदेश रावल यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube