Ravanth Reddy : तेलंगणाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी (Ravanth Reddy) यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. रेवंथ रेड्डी 2019 साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधून उतरले होते. या निवडणुकीत ते विजयी झाल्यानंतर लोकसभेवर गेले होते. त्यानंतर आता तेलंगणात काँग्रेसच्या हाती एकहाती सत्ता आल्यानंतर रेवंथ रेड्डी यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता रेवंथ रेड्डी यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे.
లోక్ సభ సభ్యత్వానికి నేడు రాజీనామా చేశాను.
ఈ రాజీనామా నా ఎంపీ పదవికి మాత్రమే…
నా మనసులో మల్కాజ్ గిరి ప్రజల స్థానం శాశ్వతం.ప్రశ్నించే గొంతుకగా నన్ను పార్లమెంటుకు పంపిన ఇక్కడి ప్రజలతో నా అనుబంధం శాశ్వతం.
చివరి శ్వాస వరకు అటు కొడంగల్,
ఇటు మల్కాజ్ గిరి నా ఊపిరి.… pic.twitter.com/CyQT0gKKnU— Revanth Reddy (@revanth_anumula) December 8, 2023
तेलंगणामध्ये काँग्रेसच्या विजयाचे नायक म्हणून रेवंथ रेड्डी यांची ओळख निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर रेवंंथ रेड्डी हेच मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा होती. अखेर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून रेवंथ रेड्डी यांनी शपथ घेतली. राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यासोबतच भट्टी विक्रमार्क यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर अन्य 11 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
ऐन थंडीत राजकारण तापलं! ‘महुआवर अन्याय अन् लोकशाहीची हत्याच’; ममता बॅनर्जी भडकल्या
दरम्यान, तेलंगणात तीन नावे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होती यातील सर्वात मोठे नाव म्हणजे रेवंत रेड्डी यांचेच होते. याशिवाय भट्टी विक्रमार्का मल्लूही शर्यतीत होते. तब्बल 1400 किलोमीटरच्या पदयात्रेनंतर मल्लू चर्चेत आले होते. तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष उत्तमकुमार रेड्डी हेही या शर्यतीत होते. मात्र, आता या दोघांचीही नावे मागे पडली असून रेवंथ रेड्डी यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
Sanjay Raut : सिंचन घोटाळा फेम अजित पवारांना.. ‘त्या’ पत्रावरून राऊतांचा खोचक टोला
रेवंत रेड्डी यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधाचाही सामना करावा लागला. यामध्ये ज्येष्ठ नेते एन. उत्तम कुमार रेड्डी, भट्टी विक्रमार्क, माजी मंत्री कोमातिरेड्डी व्यंकटा रेड्डी, माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिंह यांनी रेड्डी यांना तीव्र विरोध केला होता. रेड्डी यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराची प्रलंबित प्रकरणे आणि रेड्डी यांच्या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या खराब कामगिरीकडे लक्ष वेधले होते.