BRS MLA G. Lasya Nanditha Death : देशात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या अपघातात अनेकांचा जीव गेला आहे. आताही अशाच भीषण अपघाताची बातमी तेलंगणातून (Road Accident) आली आहे. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आलेल्या भारत राष्ट्र समितीच्या आमदार जी. लास्या नंदिता (G. Lasya Nanditha) यांचा संगारेड्डी येथे अपघाती मृत्यू झाला. अमिनपूर मंडळ जिल्ह्यातील सुलतानपूर आऊटर रिंग रोड येथील रस्त्यावर हा अपघात झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्ता दुभाजकाला जोरात धडकली. यामध्ये नंदिता यांना जबर दुखापत झाली.
लस्या नंदिता या सिकंदराबाद छावणी मतदारसंघातून निवडून (Telangana Election) आल्या होत्या. एसयूव्ही कारमधून त्या निघाल्या होत्या. रस्त्यात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ही कार दुभाजकावर जाऊन धडकली. यानंतर त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्घटनेत कारचालकही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
बीआरएसचे मिशन महाराष्ट्र; तेलंगाणाच्या मंत्र्यांची फौज 27 तारखेला पंढरपुरात दाखल होणार
रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.
Road Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! कंटेनर-कारच्या धडकेत तिघे जागीच ठार