Telangana man kills teen he assaulted, her family, wife and children after Out on bail in POCSO case : अनेकदा जामीनावर सुटलेल्या आरोपींनी पुन्हा एकदा गुन्हा केल्याची अनेक प्रकरणं समोर येत असतात. मात्र तेलंगानाच्या रंगारेड्डी जिल्ह्यामध्ये एका जामीनावर सुटलेल्या आरोपीने तब्बल 6 जणांच्या थरारक हत्या केल्या आहेत. यामध्ये त्याने चक्क त्याची पत्नी 2 मुलं आणि पिडीतेसह तिच्या कुटुंबातील 3 लोकांना संपवलं आहे. सध्या तेलंगणा पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
IND vs NEP : भारतीय संघ करणार नेपाळचा दौरा; खेळणार तीन टी20 सामने
नेमके काय घडले?
तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगारेड्डी जिल्ह्यातील शाहाबाद परिसरातील दैवलागुडा गावात ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणातील आरोपीची ओळख राजशेखर अशी झाली आहे. काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीशी छेडछाड केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. जामिनावर सुटल्यानंतर त्याने ही भीषण हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपीने प्रथम धारदार चाकूने हल्ला करून स्वतःच्या पत्नीची आणि दोन मुलांची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
यानंतर आणखी तिघांचा खून
स्वतःच्या कुटुंबीयांची हत्या केल्यानंतर आरोपी दुसऱ्या ठिकाणी गेला. तेथे त्याने पॉक्सो प्रकरणातील अल्पवयीन मुलगी, तिची आई आणि आजी यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांचाही खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने एकूण सहा जणांची निर्घृण हत्या केली. स्वतःविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याच्या रागातून आणि सूडाच्या भावनेतून हे हत्याकांड घडवून आणल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आरोपी ताब्यात; तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी राजशेखरला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला स्थानिक पोलीस ठाण्यात नेऊन गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून घटनास्थळी न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. हत्याकांडामागील नेमके कारण आणि घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी पोलीस विविध बाजूंनी तपास करत आहेत.
