Explosion in Birbhum : पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात कोळसा खाणीत भीषण (Explosion) स्फोट झाला आहे. या स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या जमखींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, ज्या कोळशाच्या खाणीत स्फोट झाला ती बीरभूम जिल्ह्यातील लोकपूर पोलीस स्टेशन परिसरात आहे.
बीरभूमच्या कोळसा खाणीत भीषण स्फोट, 7 मजुरांचा मृत्यू, अनेक जण जखमी..
VIDEO | Blast at Bhadulia Block coal mine claims two lives, injures four persons in Birbhum district of West Bengal.#birbhum pic.twitter.com/EwVvvqzlLJ
— Press Trust of India (@PTI_News) October 7, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, बीरभूम जिल्ह्यात कोळशाची खाण आहे. गंगारामचक मायनिंग प्रायव्हेट लिमिटेड कोलियरी (GMPL) असे या खाणीचे नाव आहे. या खाणीत शेकडो स्थानिक मजूर काम करतात. सोमवारी सकाळीही अनेक कर्मचारी कामावर आले होते. यावेळी कोळसा क्रशिंग दरम्यान खाणीत मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूचा परिसर हादरला. सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आला. या स्फोटात 5 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालयात नेत असताना दोन मजुरांचा मृत्यू झाला. या स्फोटात अनेक कर्मचारी जखमीही झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Madhuri Dixit : धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचे बहारदार फोटो
स्थानिकांच्या मते, अनेक मजुरांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले आहेत. दरम्यान, अनावधानाने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोट होताच अनेक कर्मचारी आणि मजूरांनी खाणीतून पळ काढला. स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या उर्वरित कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात येत आहे.
याशिवाय भाजपचे स्थानिक आमदारही घटनास्थळी पोहोचले आहेत. खाणीत आणखी अनेक लोक अडकले असण्याची शक्यता आहे. सध्या बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. पोलीस माहिती गोळा करत असून मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत आहेत.
परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात असून सर्वांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.