काँग्रेसला धक्का! पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढणार; ममता बॅनर्जींनी घोषणाच केली

काँग्रेसला धक्का! पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढणार; ममता बॅनर्जींनी घोषणाच केली

Mamata Banerjee Targets Congress : दिल्लीतील काँग्रेसच्या पराभवानंतर इंडिया आघाडीत (INDIA Alliance) अस्वस्थता वाढली आहे. आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसला अधिक (Congress Party) काळ सहन करण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत. याची प्रचिती येण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सोमवारी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. दिल्ली विधानसभा निवडणुकांचा (Delhi Election Results) पुढील वर्षात होणाऱ्या राज्याच्या निवडणुकांवर काहीही परिणाम होणार नाही असे बॅनर्जी यांनी सांगितले.

विधानसभा बजेट अधिवेशनाआधी एका बैठकीत ममता बॅनर्जी म्हणाल्या, आगामी निवडणुकीतही तृणमूल काँग्रेस दोन तृतीयांश बहुमत मिळवून सत्तेत येईल. काँग्रेसचे राज्यात काहीही नाही. त्यामुळे तृणमूल काँग्रेस स्वबळावर विजय संपादन करील.

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भारतीय जनता पार्टीचा सामना करण्यासाठी तृणमूल काँग्रेसच आहे. बंगालमध्ये काँग्रेसचे काहीच अस्तित्व नाही. आम आदमी पार्टीने (AAP) हरियाणात काँग्रेसची मदत केली नाही. काँग्रेसनेही दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीची मदत केली नाही. त्याचा फटका या निवडणुकीत बसल्याचे दिसून आले.

पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीची धडक, पाच जणांचा मृत्यू

सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे की टीएमसी प्रमुखांचं असं मत आहे की जर दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढल्या असत्या तर निकाल वेगळा लागला असता. नादियाचे टीएमसी आमदाराने सांगितले की काँग्रेसला पाच टक्के मते मिळाल्याने त्याचा परिणाम दिसला. काँग्रेसने जर थोडा लवचिकपणा दाखवला असता आणि आम आदमी पार्टीशी आघाडी केली असती तर दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल निश्चितच वेगळा राहिला असता.

हरियाणा निवडणुकीत (Haryana Elections) आम आदमी पार्टीने काँग्रेसचे समर्थन केले नाही. या निवडणुकीत जर दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढली असती तर हरियाणात भाजपला सत्तेत येता आले नसते.

दिल्लीत आम आदमी पक्षाचा पराभव

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सोमनाथ भारती, सौरभ भारद्वाज यांसारखे दिग्गज पराभूत झाले. आपला फक्त 22 जागा मिळाल्या. तर भारतीय जनता पार्टीने करिश्मा दाखवला. तब्बल 48 जागा जिंकल्या. बहुमतापेक्षाही जास्त जागा जिंकल्या. या निवडणुकीत काँग्रेस आणि आप यांची आघाडी झाली नव्हती. त्यामुळे काही मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांनी आम आदमी पार्टीच्या उमेदवारांची मते खाण्याचे काम केल्याचे सांगण्यात येत आहे. जवळपास दहा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांनी आम आदमीच्या पराभवासाठी हातभार लावल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपाच्या लाटेत दिग्गज भुईसपाट! केजरीवाल, सिसोदियांचा पराभव; ‘आप’ला मोठा धक्का

follow us
  • fb
  • instagram
  • youtube