Singham Again Trailer : बाजीराव सिंघम लंकादहन करणार, ‘सिंघम अगेन’चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित

Singham Again Trailer : बाजीराव सिंघम लंकादहन करणार, ‘सिंघम अगेन’चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित

Singham Again Trailer Release : रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) ‘सिंघम अगेन’ (Singham Again) रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटाचा ट्रेलर (Singham Again Trailer ) आज म्हणजेच सोमवारी लाँच झाला आहे. या चित्रपटात अजय देवगण (Ajay Devgn) पुन्हा एकदा पोलिसांच्या गणवेशात दिसणार आहे. सिंघम सिनेमाचा हा तिसरा चित्रपट आहे, जो यावर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. रोहित शेट्टीने याला पोलीस विश्वाचा एक भाग बनवले आहे. मात्र आता ‘सिंघम अगेन’चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)


4 मिनिटे 45 सेकंदांचा ट्रेलरमध्ये नेमकं काय?

रोहित शेट्टीने 4 मिनिटे 45 सेकंदांचा ट्रेलर कट केल्याचे वृत्त आहे. काश्मीरसारख्या लोकेशनवरही या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या चित्रपटात अजय देवगण पुन्हा एकदा इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात करीना कपूर लीड लीडची भूमिका साकारत असल्याचे सांगण्यात येत आहे. काश्मीरच्या खोऱ्यात शूटिंगदरम्यान चित्रपटाचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. या चित्रपटातील अजय देवगणचा लूकही समोर आला आहे.

रोहित शेट्टीचे पोलीस विश्व वाढत आहे

2011 मध्ये पहिल्यांदा सिंघमच्या माध्यमातून रोहित शेट्टीने पोलिस अधिकाऱ्याची थीमवर आधारित भूमिका प्रेक्षकांसमोर मांडली होती. त्याआधी गोलमाल कॉमेडीसाठी प्रसिद्ध असलेल्या रोहित शेट्टीने अजय देवगणला अत्यंत प्रामाणिक पोलीस अधिकारी म्हणून सादर केले होते. या चित्रपटाने केवळ चांगली कमाई केली नाही तर त्याची खूप चर्चाही झाली. यानंतर 2014 मध्ये रोहितने अजयसोबत पुन्हा ‘सिंघम रिटर्न्स’ सादर केला, हा चित्रपटही खूप गाजला.

आता पुन्हा सिंघम घेऊन येत आहोत. रोहितने याला पोलीस विश्वाचा एक भाग बनवले आहे. सिंघमच्या तीन चित्रपटांव्यतिरिक्त, 2018 मध्ये सिम्बा देखील या विश्वात आला होता. सूर्यवंशी 2021 मध्ये कोविड दरम्यान प्रदर्शित झाला ज्यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. यात अजय देवगण आणि रणवीर सिंगही कॅमिओ भूमिकेत होते.

Singham Again: ‘सिंघम अगेन’ क्लायमॅक्स रिलीजपूर्वीच लीक? रोहित शेट्टीने सांगितले सत्य

‘हे’ कलाकार दिसणार प्रमुख भूमिकेत

सिंघम अगेनमध्ये अजय देवगण महत्त्वाच्या भूमिकेत आहे, तर करीना कपूर खान, रणवीर सिंग, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, आशुतोष राणा, दयानंद शेट्टी आणि श्वेता तिवारी देखील या चित्रपटाचा भाग आहेत. अभिनेता अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube