Download App

कहर! बिहारमध्ये १५ दिवसांत सात पूल कोसळले, विरोधकांकडून मुख्यमंत्री नितीशकुमार लक्ष

बिहार राज्यात पूल कोसळण्याचं सत्र काही कमी झालेलं नाही. रोज एक पूल कोसळावा अशा या घटना घडत आहेत. कालही एक पूल कोसळला आहे.

Image Credit: Letsupp

Bridge collapsed in Bihar : बिहारच्या सिवान जिल्ह्यातील गंडकी नदीवरील पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना काल घडली. या घटनेत कोणीही जखमी झालं नसल्याची प्रशासनातर्फे सांगण्यात आलं. (Bridge) दरम्यान, गेल्या १५ दिवसांत बिहारमधील पूल कोसळण्याची (Bridge collapsed) ही ७वी तर सिवान जिल्ह्यातील गेल्या ११ दिवसांतील ही दुसरी घटना आहे.

मी कधीच पक्ष बदलला नाही, तुमचा दादा काम करणारा अजितदादांचं विरोधकांना सणसणीत उत्तर

सिवान जिल्ह्यातील देवारिया भागातील गंडकी नदीवरील हा छोटा पूल अनेक गावांना महाराजगंजशी जोडतो. उपविकास आयुक्त मुकेश कुमार यांनी सांगितले की, घटनेनंतर या भागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पुलाची पाहणी केली. या घटनेची चौकशी केली जात आहे. सकाळी ५च्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या पुलाची उभारणी १९८२-८३ मध्ये झाली होती.

Cotton: कापूस उत्पादकांसाठी आनंदचाची बातमी; हेक्टरी मिळणार ‘इतकी’ मदत

या पुलाच्या दुरुस्तीचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. त्यातच मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाहातील पाण्यामुळे पुलाची रचना कमकुवत होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली होती. त्यातच बुधवारी सकाळी हा पूल कोसळल्याचं कुमार यांनी सांगितलं.

सिवान जिल्ह्यात गंडकी नदी पूल दुर्घटनेच्या ११ दिवसांपूर्वीच, २२ जून रोजी दारुंडा भागातील नदीवरील पुलाचा काही भाग कोसळला होता. तसंच, बिहारमधील मधुबामी, अरारियास, पूर्व चम्पारण आणि किशनगंज जिल्ह्यातही गेल्या दोन आठवड्यांत पूल कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी बिहारमधील बांधकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, या दुर्घटनांच्या सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.

follow us

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज