पटना, सारण अन् भागलपूर..धडाधड कोसळले पूल; भ्रष्टाचार की निकृष्ट बांधकाम?

पटना, सारण अन् भागलपूर..धडाधड कोसळले पूल; भ्रष्टाचार की निकृष्ट बांधकाम?

Bihar Bridge Collapse : बिहार राज्यात सध्या एकाच घटनेची (Bihar News) तोंडोतोंडी चर्चा आहे. पुलाचं बांधकाम झालं (Araria Bridge Collapse) होतं. लवकरच उद्घाटन होणार होतं. अधिकारी कर्मचारी याच कामात गुंतले होते. पुलामुळे लोकांच्याही अडचणी कमी होणार होत्या. स्थानिक राजकारणातही या पुलाची चर्चा होती. पण, सगळंच बिघडलं. उद्घाटन होण्याआधीच पूल नदीच्या पाण्यात कोसळला अन् कोट्यावधींचा खर्चही या पाण्यात वाहून गेला.

सिकटीमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला पूल क्षणार्धात कोसळून पडला. बकरा नदीच्या पडरिया घाटावर या पूलचं बांधकाम करण्यात आलं होतं. काहीच दिवसात या पुलाचं उद्घाटन होणार होतं. मात्र त्याआधीच हा पूल जमीनदोस्त झाला. तुम्हाला या पुलाच्या बांधकामासाठी किती पैसे खर्च झाले याचा आकडा बसून धक्का बसेल. या पुलासाठी तब्बल 7 कोटी 79 लाख 60 हजार रुपये खर्च करण्यात आले होते.

इतके पैसे खर्च करून तयार केलेला पूल टिकला का नाही? नवीनच पूल कोसळतो तरी कसा? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यासोबतच पुलासाठी वापरण्यात आलेलं बांधकाम साहित्य अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं असा आरोप आता केला जात आहे. यात किती सत्यता आहे याचं उत्तर पूर्ण चौकशी झाल्यानंतरच मिळेल परंतु, यानिमित्ताने बिहारमध्ये पूल कोसळण्याचा सिलसिला मात्र कायम राहिला आहे.

Gujarat Bridge Collapse : मोठी दुर्घटना! गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला; 2 जण ठार

पुलाचं बांधकाम झाल्यानंतर प्रशासनाकडून उद्घाटनाची तयारीही केली जात होती. मात्र त्याआधीच पूल कोसळला. तसं पाहिलं पूल कोसळण्याच्या घटना बिहारमध्ये नव्या नाहीत. मागील तीन वर्षांच्या काळात नऊ पूल कोसळले आहेत. यातील काही पूल तर असे होते ज्यांचं बांधकाम सुरू असतानाच ढासळले गेले. तर काही पूल उद्घाटनानंतर काही दिवसांनी कोसळले.

अररियातील पूल उद्घाटनाआधीच जमीनदोस्त

आताचा जो पूल कोसळला आहे तो बिहारमधील अररिया जिल्ह्यातील सिकटीतील बकरा नदीवर बांधण्यात आला होता. सिकटी आणि कुर्साकाटा भागाला जोडण्याच्या उद्देशाने पूल तयार केला होता. पूल बांधकाम करतानाही बांधकाम विभागाला अनेक अडचणी आल्या. पूल पहिल्यांदा तयार केला तेव्हा पुरामुळे नदीचा किनारा लांब राहिला होता.

नदीच्या किनाऱ्यापर्यंत पुलाला जोडण्यासाठी पुन्हा 12 कोटी रुपये खर्च करून बांधकाम सुरू करण्यात आले होते. परंतु, सोमवारी (18 जून) हा पूल अचानक कोसळला. एनएचएआय मार्फत मधुबनी जिल्ह्यातील भेजा आणि सुपौलमधील बकौर दरम्यान कोसी नदीवर आणखी एका पुलाचं काम केलं जात होतं. याच दरम्यान 22 मार्च 2024 रोजी पुलाचा काही भाग तुटला होता. या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला होता. तर नऊ लोक जखमी झाले होते. या पुलासाठी तब्बल 1200 कोटी रुपये खर्च केले जात होते.

बिहारमध्ये 1700 कोटी खर्चून गंगा नदीवर बांधला जाणारा पूल कोसळला, VIDEO व्हायरल

पुलांच्या कोसळण्याचा सिलसिला सुरुच..

याआधी भागलपूरमधून वाहत जाणाऱ्या गंगा नदीवर 1710 कोटी रुपये खर्च करून चार पदरी पुलाचे बांधकाम केले जात होते. या पुलामुळे उत्तर आणि पूर्व बिहारशी संपर्क सोपा झाला असता. पण, दु्र्दैवाने पुलाचे बांधकाम सुरू असतानाच पूल कोसळला. सारणमधील एक जुनाट पूल कित्येक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत होता. इंग्रजांच्या काळात या पुलाचं बांधकाम झालं होतं. त्यामुळे आता हा पूल अतिशय जर्जर झाला होता. तातडीने दुरुस्तीची गरज होती. मात्र कुणाच्याच लक्षात आलं नाही. अखेर दुरुस्तीचा वाट पाहता पाहता पूल कायमचाच कोसळून पडला.

पटना, दरभंगा, सारण अन् भागलपूर.. धडाधड कोसळले पूल

19 फेब्रुवारी 2023 मध्ये बिहारची राजधानी पटनात चार पदरी पूल बांधकाम सुरू असतानाच कोसळला. अशीच घटना 16 जानेवारी 2023 रोजी दरभंगा जिल्ह्यात घडली. येथे कमला बलान नदीवरील पूल कोसळला. हा पूल दरभंगा जिल्ह्याला मधुबनी आणि समस्तीपूर जिल्ह्याला जोडत होता.

18 नोव्हेंबर 2022 मध्ये नालंदात निर्माणाधीन पूल कोसळला होता. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याआधी 9 जून 2022 या दिवशी सहरसामध्ये एक पूल कोसळला. या अपघातात तीन मजूर जखमी झाले होते. 20 मे 2022 रोजी राजधानी पटनात 136 वर्षे जुना पूल पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. या पुलाचं बांधकाम इंग्रजांच्या काळात 1884 मध्ये झालं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube