First Phase Voting In Jammu and Kashmir : जम्मू व काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये आज, बुधवार (दि. १८ सप्टेंबर)रोजी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात 24 मतदारसंघात मतदान होणार असून, (Jammu and Kashmir) जम्मू व काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे.
राहुल गांधी देशाची निंदा करतात, त्यांचा पासपोर्ट रद्द करावा; रामदास आठवलेंची मोठी मागणी
या टप्प्यात जवळपास 20 लाख 30 हजार मतदार मताधिकार बजावणार आहेत. या टप्प्यात ट्राल, पुलवामा, राजपोरा, शोपियान, कुलगाम, अनंतनाग, पहलगाम, किश्तवार, डोडा, बानीहाल या मतदारसंघांचा प्रामुख्याने समावेश आहे. अखेरच्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होणार असून मतमोजणी येत्या 8 ऑक्टोबरला होणार आहे.
गणपती विसर्जनाची धामधूम अन् पुण्यातील या भागात गोळीबार
या मतदानासाठी मतदानाची पूर्ण तयारी झाली असून सुरक्षेच्या उपाययोजना केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या लढतीत प्रामुख उमेदवारांमध्ये नॅशनल कॉन्फरंसचे हसनैन मसुदी (पाम्पोर), मोहम्मद खलील बंड (पुलवामा), काँग्रेसचे सुरिंदर सिंग (ट्राल) यांचा समावेश आहे.
Polling for 24 Assembly constituencies across Jammu & Kashmir (16 in Kashmir and 8 in Jammu), begins.
This marks the first Assembly elections in J&K since the abrogation of Article 370 in August 2019. pic.twitter.com/DKgttnJrVs
— ANI (@ANI) September 18, 2024