Tirupati Balaji Mandir News : देशभरातील कोट्यावधी नागरिकांचे श्रद्धास्थान तिरुपती तिरुमला मंदिरातून (Tirupati Balaji Mandir) एक मोठी बातमी समोर आलीयं. तिरुपती मंदिरामधील प्रसादाच्या लाडूंमध्ये गोमांस चरबी असल्याचं समोर आलंय. नॅशनल डेव्हलपमेंट बोर्डाने यासंदर्भात खुलासा केलायं. या प्रकरणामुळे देशभरात एकच खळबळ उडालीयं.
जांच रिपोर्ट से पुष्टि हुई कि तिरुपति मंदिर में वितरित प्रसाद के लड्डू बनाने में बीफ चर्बी और मछली के तेल का इस्तेमाल किया गया ।
जब सरकार हिंदू विरोधी होती है तो वह सबसे पहले आस्था पर हमला करती है। pic.twitter.com/e0Bk8g3vvh
— Shandilya Giriraj Singh (@girirajsinghbjp) September 19, 2024
नॅशनल बोर्डाच्या अहवालानुसार, तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये माश्याचं तेल, गोमांस आणि चरबीचा वापर होत आहे. विशेष म्हणजे तिरुपती बालाजीलाही गोमांस चरबीयुक्त लाडू प्रसाद म्हणून चढवले जात असल्याचं अहवालात समोर आलंय.
या प्रकरणावरुन आंध्र प्रदेशात एकच खळबळ उडाली असून मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जगमोहन रेड्डी यांना घेरलंय. मागील सरकारच्या काळात तिरुपती मंदिरातील प्रसाद लाडू तयार करण्यासाठी तुपाऐवजी जनावरांची चरबीचा वापर केला जात होता. प्रसादाचे लाडू खराब गोष्टींचा वापर करुन बनवले जात असल्याचंही नायडू म्हणाले आहेत.
तिरुपति देवस्थानम के पवित्र लड्डू में बीफ फैट और मछली के तेल की पुष्टि हुई है।
यह हिन्दू धर्म की आस्था और विश्वास के विरुद्ध जघन्यतम अपराध है और पूर्ववर्ती YSRCP की सरकार के हिन्दू विरोधी होने पुख्ता प्रमाण है।
जगन मोहन रेड्डी सरकार ने करोड़ों हिंदुओं की आस्था के साथ खिलवाड़… pic.twitter.com/SzNmQSfQ7K— Vinod Tawde (@TawdeVinod) September 19, 2024
तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू बनवण्यासाठी आता शुद्ध तुपाचा वापर केला जात असून मंदिरातील प्रत्येक वस्तूची तपासणी केली जात आहे. वायएसआरसीपी सरकारने भक्तांच्या धार्मिक भावनांचा सन्मान करु शकत नाही, तिरुपती बालाजी मंदिर पवित्र मंदिर असून लाडूमध्ये गोमांस चरबीचा समावेश असल्याचं समोर आल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसलायं. मंदिर प्रशासनाकडून तुपाच्याऐवजी चरबीचा वापर केला आहे, वायएसआरसीपी सरकारच्या या कारनाम्याची आम्हाला लाज वाटत असल्याची टीका आंध्रप्रदेश आयटी मंत्री नारा लोकेश यांनी केलीयं.