Download App

ममतांचा किल्ला अभेद्य; बंगालमध्ये कमळ कोमेजले तर पंजा रिकामाच

Bengal Panchayat Election : पश्चिम बंगालमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या अनेक जागांवर चित्र स्पष्ट झाले असून, त्यात टीएमसी एकतर्फी विजयाकडे वाटचाल करत आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, तृणमूल काँग्रेस (TMC) ने पश्चिम बंगालमधील 18 हजार 590 ग्रामपंचायती जागांवर विजय मिळवला, तर भारतीय जनता पक्षाने (BJP) 4 हजार 479 जागा जिंकल्या. सीपीआय (एम) आणि काँग्रेसने अनुक्रमे 1 हजार 426 आणि 1 हजार 071 जागा मिळवल्या आहेत, तर अपक्ष उमेदवारांनी 1 हजार 062 जागा जिंकल्या आहेत. एसईसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली आणि पुढील दोन दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. मतपत्रिकांची मोजणी आणि निकालांना वेळ लागेल.”

लोकसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधी होत असलेल्या पंचायत निवडणुका मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील मतदार आहेत. त्यामुळे या निवडणुकांकडे लोकसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. पश्चिम बंगालच्या राजकारणावर तृणमूल काँग्रेसची असलेली पकड 2008 च्या पंचायत निवडणुकांमध्ये दिसून येते. त्यावेळी तृणमूलने काँग्रेससह पंचायत निवडणुकीवरील डाव्या आघाडीचे दशकभराचे वर्चस्व संपुष्टात आणले होते आणि तत्कालीन सत्ताधारी आघाडीची संख्या खाली आणली. 85-90% च्या आसपास मिळणाऱ्या जागा फक्त 50% वर आणल्या होत्या.

मोदींना टिळक राष्ट्रीय पुरस्कार; नाना पटोलेंची सडकून टीका, म्हणाले, टिळक जिवंत असते तर…

टीएमसी आणि काँग्रेसने सीपीआय(एम) च्या नेतृत्वाखाली डाव्या आघाडीकडून प्रत्येकी दोन जिल्हा परिषद जिंकल्या होत्या. तसेच इतर अनेक ठिकाणी जोरदार लढत दिली होती. एक वर्षानंतर, सिंगूर आंदोलन आणि TMC मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रवेशानंतर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवून डाव्यांचा किल्ला नेस्तनाबूद केला होता. पंचायत निवडणुकांचा हा ट्रेंड अद्याप बदलेला नाही.

Rajasthan : गहलोत विरुद्ध पायलट संघर्ष आणखी तापणार? काँग्रेसचा मोठा निर्णय

2018 च्या पंचायत निवडणुका देखील एक नांदी ठरल्या होत्या. कथित मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पंचायत जागांचे निकाल सत्ताधारी पक्षाच्या बाजूने बिनविरोध घोषित करण्यात आले होते. याचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फायदा मिळाला होता. यामुळे बंगालमध्ये भाजपने तृणमूलनंतर दोन नंबरच्या जागा मिळवल्या होत्या.

Tags

follow us