Tripura Local Body Elections : निवडणूक न लढताच कुठला पक्ष विजयी होतो काय नाही ना पण.. ही किमया भाजपने त्रिपुरा (Tripura Local Body Elections) या राज्यात करुन दाखवली आहे. कधीकाळी डाव्या पक्षांचा बालेकिल्ला राहिलेल्या त्रिपुरात आता डावे पक्ष औषधालाही दिसत नाहीत. या राज्यात भाजपाचं मजबूत (BJP in Tripura) सरकार असून स्थानिक निवडणुकीतही पक्षाचाच दबदबा दिसून येत आहे. राज्यातील पंचायत निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी राज्यातील 71 टक्के जागांवर बिनविरोध विजय मिळवल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यातील पंचायतींत एकूण 6 हजार 889 जागा आहेत. यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांचा समावेश आहे. यातील 4 हजार 805 जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. मतदान 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. मात्र यातील बहुतांश ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत त्यामुळे आता मतदानाची गरजच राहिलेली नाही.
Tripura Election: विजयाचा दावा करणाऱ्या 259 उमेदवारांपैकी 41 जणांवर गुन्हे दाखल
त्रिपुरा राज्य निवडणूक आयोगाचे सचिव असित कुमार दास यांनी सांगितले की ग्रामपंचायतींमध्ये भाजपाला एकूण 6 हजार 370 जागांपैकी 4 हजार 550 जागांवर बिनविरोध विजय मिळाला आहे. या कारणामुळे 71 टक्के जागांवर मतदान होणार नाही. ज्या 1 हजार 819 जागांवर मतदान होणार आहे तेथे भाजपाने 1 हजार 809, माकपा 1 हजार 222 आणि काँग्रेसे 731 उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे. भाजपाचा मित्र पक्ष टिपरा मोथाने 138 जागांवर उमेदवार दिले आहेत.
पश्चिम त्रिपुरातील महेशखला पंचायतीत एकाही जागेसाठी मतदान होणार नाही. या जागेवर भाजप उमेदवाराचा मृत्यू झाला होता. दास यांनी सांगितले, पंचायत समित्यांतील एकूण 423 पैकी 235 जागांवर भाजपने बिनविरोध वीज मिळवला आहे. आता 188 जागांसाठी मतदान होईल. 116 जिल्हा परिषदेतील जागांपैकी 20 जागा बिनविरोध झाल्या आहेत.
या निवडणुकीसाठी अर्ज माघारीची अंतिम मुदत 8 ऑगस्ट आहे. मतमोजणी 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. मागील निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपाने 96 टक्के जागांवर बिनविरोध विजय मिळवला होता. आताही परिस्थिती फारशी बदललेली नाही. राज्यातील ग्रामीण भागातही आता भाजपाने आपली पकड आणखी मजबूत केल्याचे या निवडणुकीतून दिसून येत आहे.
Election Results 2023 Live : त्रिपुरामध्ये भाजप आणि डाव्यांमध्ये निकराची लढत, दोन्ही पक्ष आघाडीवर