Tripura Election: विजयाचा दावा करणाऱ्या 259 उमेदवारांपैकी 41 जणांवर गुन्हे दाखल

  • Written By: Published:
Tripura Election: विजयाचा दावा करणाऱ्या 259 उमेदवारांपैकी 41 जणांवर गुन्हे दाखल

त्रिपुरा : त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 259 उमेदवार रिंगणात आहेत. एका अहवालानुसार, निवडणुकीच्या रिंगणात विजयाचा दावा करणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये जवळपास 45 करोडपती उमेदवार आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की भाजपकडे एकूण 17 करोडपती उमेदवार आहेत. टिपरा मोथा पक्षाचे 09 आणि माकपचे सात उमेदवार कोट्यधीश आहेत.

भाजपचे सर्वाधिक करोडपती उमेदवार

वृत्तानुसार, काँग्रेसचे सहा करोडपती उमेदवार आहेत, तृणमूल काँग्रेसचे चार आणि दोन अपक्ष उमेदवारही कोट्यधीश आहेत. चारिलम मतदारसंघातून भाजपचे उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा हे 15.58 कोटी रुपयांच्या चल आणि अचल संपत्तीसह सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याचे सांगितले जाते. एडीआरचे राज्य समन्वयक बिस्वेंदू भट्टाचार्जी यांनी बुधवारी सांगितले की, मुख्यमंत्री माणिक साहा 13.90 कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार आहेत.

Rahul Gandhi : राहुल गांधींचे ‘ते’ वक्तव्य अखेर हटवले..
साहा हे बारडोवली शहरातून निवडणूक लढवत आहेत. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीतील तिसरे सर्वात श्रीमंत उमेदवार टिपरा मोथा पक्षाचे अभिजीत सरकार आहेत. त्यांची एकूण संपत्ती 12.57 कोटी रुपये आहे. भाजपने एकूण 55 उमेदवार उभे केले आहेत, पक्षाची सरासरी मालमत्ता देखील सर्वाधिक 1.86 कोटी रुपये आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube