Download App

मोठी बातमी! भारतीय लष्कराचा म्यानमार सीमेवर हल्ला, बंदी घातलेल्या उल्फा (आय)चा मोठा दावा

अनेक छावण्यांवर ड्रोनने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बंदी घातलेल्या संघटनेचा एक वरिष्ठ नेता ठार झाला तर १९ जण जखमी झाले

  • Written By: Last Updated:

ULFA (I) Claims On India Army : बंदी घातलेल्या दहशतवादी गट उल्फा (आय) ने आज रविवारी (दि. 13) जुलै रोजी दावा केला की भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवरील त्यांच्या छावण्यांवर ड्रोन हल्ले केले आहेत. (Army) मात्र, सशस्त्र दलांकडून या घटनेची पुष्टी झालेली नाही. उल्फा (आय) ने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, पहाटे अनेक छावण्यांवर ड्रोनने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बंदी घातलेल्या संघटनेचा एक वरिष्ठ नेता ठार झाला तर १९ जण जखमी झाले असा दावाही त्यांनी त्यांनी केला आहे.

मान्यमानरच्या सागिंग क्षेत्रात ULFA(I) नावाची दहशतवादी संघटना कार्यरत आहे. याच संघटनेने भारतीय सेनेने आमच्या शिबिरांवर ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. ULFA(I) या संघटनेच्या दाव्यानुसार या ड्रोन हल्ल्यांत एका वरिष्ठ नेत्यासह एकूण 19 लोक जखमी झाले आहेत. भारताच्या संरक्षण दलाचे प्रवत्यांनी मात्र आम्हाला या घटनेबाबत कोणताही माहितीन नाही, असं सांगितलं आहे. भारतीय लष्कराने ड्रोन हल्ल्यासारख्या कोणत्याही ऑपरेशनची आम्हाला माहिती नाही, असं म्हटले आहे. विशेष म्हणजे ULFA(I) या संगटनेने भारताच्या ड्रोन हल्ल्यात आमचा एक वरिष्ठ नेताही मारला गेल्याचा दावा केला आहे.

लष्कराचं स्पष्टीकरण

ULFA(I) या संघटनेनुसार त्यांच्या अनेक वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या शिबिरांवर ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. या बंदी असलेल्या संघटनेचा एक वरिष्ठ नेतादेखील मारला गेल्याचा दावा केला जातोय. तर, अन्य 19 जण जखमी झाले आहेत ULFA(I) संघटनेच्या दाव्यावर लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी मात्र भारतीय लष्कराकडे अशा प्रकारच्या कोणत्याही ऑपरेशनची माहिती नाही, असं स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, याच संघटनेशी संबंधित असलेला नेता अरबिंद राजखोवा याला बांगलादेशमधून अटक करण्यात आली होती. बांगलादेशमधून अटक करून त्याला भारतात आणण्यात आलं होतं.

युनायटेड लिबरेशन फ्रँट ऑफ आसा अर्थात ULFA(I) ही एक प्रमुख दहशतवादी संघटना आहे. या संघटनेची स्थापना 1979 साली करण्यात आली होती. परेश बरुआ नावाच्या व्यक्तीने आपल्या काही सहकाऱ्यांना सोबत घेत या संघटनेची स्थापना केली होती. सशस्त्र लढा उभारून आसाम राज्याला स्वायतत्ता मिवळून देणं, हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारने 1990 साली या संघटनेवर बंदी घातली होती.

 

follow us

संबंधित बातम्या