Union Budget 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) नेतृत्वातील एनडीए सरकार सत्तेत आहे. या सरकारकडून (NDA Government) आज बजेट सादर होणार आहे. या बजेटकडे देशाचे लक्ष (Union Budget 2024) लागले आहे. तसेच एनडीए सरकारमधील घटक पक्षही या बजेटची आतुरतेने वाट पाहत आहेत. या बजेटमध्ये सरकारकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. यातच आता मोदी सरकारने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपीला (Chandrababu Naidu) मोठं गिफ्ट दिलं आहे. नायडू यांनी एनडीए सरकारला पाठिंबा दिला आहे. या बदल्यात टीडीपीला केंद्र सरकारमध्ये एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळालं आहे.
केंद्रात भाजपला बहुमत नाही. त्यामुळे घटक पक्षांची काळजी भाजपकडून घेतली जात आहे. या सरकारमध्ये टीडीपी आणि नितीश कुमार यांचा जेडीयू हे दोन मोठे साथीदार आहेत. टीडीपीचे 16 आणि जेडीयूचे 12 खासदार आहेत. या पक्षांना खूश ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने होत आहे. अशातच आता मोदी सरकारने (Modi Government) एक मोठा निर्णय घेतला आहे.
Union Budget 2024 : किसान सन्मान निधी 8 हजारांवर? निर्मलाताई शेतकऱ्यांचे वर्ष गोड करण्याची शक्यता
लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाजाचं थेट प्रक्षेपण संसद टीव्हीवर होत असते. आता हे प्रसारण तेलुगू भाषेतही सुरू करण्यात आले आहे. संसदेत बजेट सत्र (Budget Session 2024)सुरू झाले आहे. युट्यूबवर संसद टीव्हीने संसदेचं कामकाज तेलुगू भाषेत दाखवण्यास सुरुवात केली आहे. सेट टॉप बॉक्समध्ये तेलुगू भाषा निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. या सुविधेमुळे तेलुगू भाषिकांना त्यांच्या मातृभाषेत संसदेचे कामकाज पाहता आणि ऐकता येणार आहे.
संसदेचं अधिवेशन सुरू होताच आंध्र प्रदेश, बिहार आणि ओडिशा (Odisha) या राज्यांना विशेष राज्यांचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात आली. ऑल पार्टी मीटिंगमध्ये जेडीयू, आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस आणि ओडिशातील बिजू जनता दलाने ही मागणी केली. काँग्रेस नेते (Congress party) जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या मुद्द्यावर टीडीपी गप्प का आहे असा खोचक टोला लगावला होता. सरकारचं कामकाज सुरू झालेलं असताना विरोधी पक्ष त्यातही काँग्रेसच्या नेत्यांकडून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत.