Download App

शेतीचं बजेट! दीड लाख कोटींची तरतूद अन् शेतकऱ्यांसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म; बजेटमध्ये घोषणा

सरकारने कृषी क्षेत्रासाठी १.५२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात येणार.

Union Budget 2024 : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज सलग सातव्यांदा देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक (Budget 2024) महत्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या. देशातील सर्व नागरिकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे असे सितारमण (Nirmala Sitharaman) यांनी स्पष्ट केले. डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यावर भर दिला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे. १.५२ लाख रुपयांची तरतूद सरकारने कृषी क्षेत्रासाठी केली आहे. 32 फळे आणि भाज्यांच्या 109 जाती वितरीत केल्या जाणार आहेत. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सहकार क्षेत्राचा विकास करणार, अशा महत्वाच्या घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केल्या.

कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढविण्यावर आगामी काळात भर दिला जाणार आहे. नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात येणार. नव्या रोजगार निर्मितीसाठी दोन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. तीस लाख युवकांच्या रोजगारासाठी सरकार योजना तयार करणार. महिलांच्या रोजगारासाठीही विशेष प्रयत्न आगामी काळात केले जातील अशी माहिती सितारमण यांनी दिली.

Union Budget 2024 : देशाचं बजेट सांभाळणाऱ्या सीतारमण यांच्याकडे एक कारही नाही; जाणून घ्या संपत्ती कीती?

बिहारमध्ये मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात येणार. देशात नव्या महामार्गांची घोषणा सितारमण यांनी केली. शैक्षणिक कर्जासाठी तीन टक्क्यांच्या व्याजासाठी ई व्हाऊचर. 26 हजार कोटी रुपये खर्च करून देशात नव्या रस्त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. आंध्र प्रदेशसाठी तब्बल 50 हजार कोटी रुपयांचे अर्थ सहाय्य देण्याची घोषणा सितारमण यांनी केली.

follow us