Union Budget 2024 : देशाचं बजेट सांभाळणाऱ्या सीतारमण यांच्याकडे एक कारही नाही; जाणून घ्या संपत्ती कीती?

Union Budget 2024 : देशाचं बजेट सांभाळणाऱ्या सीतारमण यांच्याकडे एक कारही नाही; जाणून घ्या संपत्ती कीती?

Union Budget 2024 Nirmala Sitharaman Net Worth: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) नेतृत्वात सत्तेत आलेल्या एनडीए सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प (Union Budget 2024 ) सादर होणार आहे. यंदाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण याच (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र सातव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची संपत्ती नेमकी किती? तसेच त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

‘हाययेस्ट वेड लावणारा अभिनेता असणे माझ्यासाठी महत्वाचे’, अभिनेता प्रसाद ओक असं का म्हणाला?

देशाचा अर्थ मंत्रालय सांभाळणाऱ्या सीतारामन यांची प्रतिमा स्वच्छ असून त्या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री आहेत. ज्यांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. 18 ऑगस्ट 1959 ला तामिळनाडूतील मदुराई येथे एका सामान्य मात्र सुशिक्षित परिवारामध्ये सीतारामन यांचा जन्म झाला. तमिळ अय्यंगर ब्राह्मण असलेल्या रेल्वेमध्ये काम करणाऱ्या नारायण सीतारामन यांच्या त्या कन्या आहेत. निर्मला यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल त्यानंतर एम फिल केलं.

जगातले अजब देश! जनतेकडून घेत नाही एक रुपयाचाही टॅक्स; तरीही इकॉनॉमी स्ट्राँग..

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सतत त्यांची पदोन्नती होत राहिली आहे. सुरुवातीला भाजपच्या प्रवक्त्या, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या, त्यानंतर व्यापार आणि उद्योग खात्याच्या राज्यमंत्री तर पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कार्यकाळामध्ये त्या संरक्षण मंत्री होत्या. त्यानंतर आता त्या अर्थ खात सांभाळत आहेत. फोर्ब्स ने देखील जगातील सशक्त महिलांच्या यादीमध्ये त्यांचं नाव समाविष्ट केलं आहे.

एका अहवालानुसार त्यांच्याकडे 2,50,99,396 रुपयांची संपत्ती आहे. ज्यामध्ये स्थावर आणि जंगम अशा दोन्ही प्रकारच्या मालमत्तांचा समावेश आहे. ज्यामध्ये 315 ग्रॅम सोनं, 2 किलो चांदी, हैदराबादच्या जवळ 16 लाखांची जमीन, शेअर बाजार तसेच इतर कंपन्यांमधील गुंतवणूक, तर त्यांच्याकडे सतरा हजार दोनशे रुपयांची नगदी रक्कम आणि बँक खात्यावर 45,04,479 रुपये आहेत. त्याचबरोबर काही वैयक्तिक कारणांसाठी त्यांनी 33,94,838 रुपयांचं कर्ज देखील घेतलेलं आहे. देशाचं अर्थ खात सांभाळत असल्या तर देखील सीतारामन यांच्याकडे एकही कार नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube