Download App

देशभरात अवकाळी पावसाची हजेरी! बंगळुरुमध्ये यलो अलर्ट जारी

देशभरात गर्मी वाढत असताना अनेक शहरांत अवकाळी पाऊसही होत आहे. आज बंगळुरू शहरात पाऊस झाला. पुढील काही दिवस पाऊस होण्याच अंदाज आहे.

Weather Forecast : देशभरातील वातावरणात अचानक बदल झाला आहे. उन्हाळ्याचे चटके वाढले आहेत. गर्मीने उच्चांक गाठला आहे. (Rain) यामध्येच देशभरातील अनेक शहरामंध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. (Unseasonal rain) हवामान खात्याने नुकताच मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता.

 

नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

आज सकाळपासून बंगळुरुमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या जोरदार पावसामुळे शरहात अनेक भागात पाणी साचलं आहे. यामध्ये काही भागातील पाणी बाहेर काढता काढता प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली आहे. ट्रॅफिक पोलिसांनी रहदारी भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत.

 

गर्मीचा उच्चांक

भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तसंच, जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर वातावरणाचा आणि गर्मीचा उच्चांक पाहता पुढील सात दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

 

सामान्यतः ढगाळ वातावरण असेल

8 मे रोजी तापमान हवामान विभागाच्या अंदाजानुसार 21 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान असेल. 9 मे रोजी तापमान 22 ते 36 अंश सेल्सिअस आणि सामान्यतः ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. 10 मे ते 13 मे पर्यंत तापमान 23 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, सामान्यतः ढगाळ आकाश आणि हलका पाऊस होईल असाही अंदाज वर्तवला आहे.

follow us