UPI Transaction Fraud : सायबर फसवणूक रोखण्यासाठी मोदी सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात आलंय. आता UPI द्वारे पेमेंटपूर्वी होणार मोबाईल नंबरची ‘फ्रॉड’ चेकिंग होणार आहे. सरकारकडून नवीन सिस्टीम FRI लॉन्च (UPI Transaction Fraud) केलं आहे. या सिस्टीमनुसार आता युपीआयद्वारे पेमेंट करण्यापूर्वी मोबाईल नंबरची फ्रॉड चेकिंग होणार आहे. त्यामुळे आता सायबर फ्रॉडला आळा घालण्यासाठी मदत होणार आहे.
या सिस्टीम डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमांतून लॉन्च करण्यात येत आहे. सरकारकडून सांगण्यात आलंय की, या टूलच्या माध्यमातून डेटा बेस्ड सिस्टीम कोणता व्यवहार आपल्याला धोकादायक आहे, याबाबतची महिती देणार आहे. त्यामुळे सायबर फ्रॉडपासून युजर्सला संरक्षण मिळणार आहे.
DoT Introduces "Financial Fraud Risk Indicator (FRI)" to strengthen Cyber Fraud Prevention
➡️FRI enables Enhanced Intelligence sharing with Banks, UPI service providers and Financial Institutions
➡️Boosts cyber protection and validation checks in case of mobile numbers flagged…
— PIB India (@PIB_India) May 21, 2025
म्हणजेच युपीआय व्यवहार पूर्ण होण्यासाठी वेळ लागत असेल तर व्यवहार रिस्क अलर्टमध्ये अडकला असल्याचं समजणार आहे. एफआरआय म्हणजेच आर्थिक फसवणूक जोखीम निर्देशक ही एक प्रणाली आहे. या प्रणालीच्या आधारे मोबाईल नंबर फ्रॉड आहे की नाही याची तपासणी होणार आहे.
भारतात डिजिटल पेमेंट वेगाने वाढत असून मागील वर्षी 200 अब्जाहून अधिक डिजिटल व्यवहार झाले. पण यासोबतच सायबर गुन्हेही वाढले आहेत. अशा परिस्थितीत एफआरआय हे एक शस्त्र आहे, या शस्त्रामुळे संस्थांना वेळेत फसवणूक रोखण्यास मदत होणार आहे. डिजिटल इंटेलिजेन्स युनिट ही एक दुरसंचार विभागाची युनिट आहे. या युनिटच्या माध्यमातून मोबाईलचा नंबर रिव्होकेशन लिस्ट तयार करणार आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मोबाईल नंबरची यामध्ये तपासणी होणार आहे. फसवणूक करणारे मोबाईल नंबर काही दिवसांसाठीच सक्रिय राहत असतात, त्यामुळे असे मोबाईल नंबर ओळखणे गरजेचे आहे.
दरम्यान, भारतात आज UPI हा सर्वात लोकप्रिय पेमेंट पर्याय बनला आहे. या परिस्थितीत एफआरआय सारख्या गुप्तचर-आधारित प्रणालींद्वारे, लाखो लोकांना सायबर फसवणुकीचे बळी होण्यापासून वाचवता येणार आहे.