Download App

UPI यूजर्स; दिवसात ‘इतक्या’ वेळाच करता येणार बॅलन्स चेक, सरकारने केला मोठा बदल

UPI New Rules : भारतात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात यूपीआयने पेमेंट करण्याची संख्या झपट्याने वाढत चालली आहे मात्र कधी कधी

  • Written By: Last Updated:

UPI New Rules : भारतात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात यूपीआयने पेमेंट करण्याची संख्या झपट्याने वाढत चालली आहे मात्र कधी कधी यूपीआयने पेमेंट करताना युजर्सला अनेक अडचणींना सामोरे जावे लागतो मात्र नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून (16 जून) यूपीआय पेमेंट फास्ट होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पेमेंटसाठी प्रक्रिया वेळ 10 सेकंदांपर्यंत कमी केला आहे.

एनपीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, 16 जूनपासून यूपीआय व्यवहार 30 सेकंदांऐवजी 10 ते 15 सेकंदात पूर्ण होणार आहे. तर दुसरीकडे एनपीसीआयने आणखी एक मोठा निर्णय घेत दिवसांत बॅलन्स तपासणाऱ्यांसाठी एक मर्यादा देखील निश्चित केली आहे.

एनपीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, यूपीआय युजर्सला दिवसात आता 50 वेळा बॅलन्स तपासता येणार आहे. आतापर्यंत बॅलन्स तपासण्याची कोणतीही मर्यादा निश्चित नव्हती. मात्र आता यूपीआय युजर्सला एका दिवसात 50 वेळा बॅलन्स चेक करता येणार आहे.

यूपीआय व्यवहारांच्या नियमांमध्ये बदल

सेबीने म्हटले आहे की सुरक्षा बाजारात यूपीआयद्वारे होणारे व्यवहार सुरक्षेच्या दृष्टीने खूप मजबूत केले जात आहेत. गुंतवणूकदारांना बळकटी देण्यासाठी, बाजार नियामक ‘सेबी चेक’ नावाची एक नवीन क्षमता विकसित करत आहे.

ऑपरेशन सिंदूननंतर पहिल्यादांच 5 ऑक्टोबरला भारत- पाकिस्तान भिडणार , ICC ची मोठी घोषणा

हे नवीन साधन क्यूआर कोड स्कॅन करून किंवा यूपीआय आयडी प्रविष्ट करून आणि नोंदणीकृत मध्यस्थांचा खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड सारख्या बँक तपशीलांची पडताळणी करून यूपीआय ओळखीची सत्यता पडताळण्यास सक्षम करेल.

follow us