Public Disclosure Scheme : देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक असलेल्या UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून दरवर्षी 10 प्रमुख परीक्षा घेण्यात येतात. यामधून सुमारे 6,400 यशस्वी उमेदवारांची निवड (Pratibha Setu)होते, मात्र दुसरीकडे अंतिम फेरीपर्यंत पोहोचूनही सुमारे 26 हजार उमेदवार अयशस्वी ठरतात. या गुणवत्ताधारक, मेहनती आणि तयारीत कणभरही उणीव नसलेल्या उमेदवारांसाठी आता UPSC ने एक महत्त्वपूर्ण पाऊल (UPSC Private Job Details) उचललं आहे.
आयोगाने नुकतीच सुरू केलेली ‘सार्वजनिक प्रकटीकरण योजना’ (Public Disclosure Scheme – PDS) आता खासगी क्षेत्रासाठीही खुली करण्यात आली आहे. 2025 पासून सुरू झालेल्या या नव्या टप्प्यामुळे, निवड न झालेल्या परंतु परीक्षेत चांगली कामगिरी केलेल्या उमेदवारांची माहिती खासगी कंपन्यांसोबत शेअर केली जाणार आहे.
मुंबई गुजरातचीच, मुंबईत केवळ 32 टक्केच मराठी लोक; दुबेंनी ठाकरे बंधूंना पुन्हा ललकारलं
UPSC फेल, पण करिअर सेट
UPSC परीक्षेच्या अंतिम फेरीत पोहोचलेले 32 वर्षीय अरुण के. हे त्याच 26,000 उमेदवारांपैकी एक. परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अगदी जवळ पोहोचल्यानंतरही त्यांची निवड झाली नाही. त्यामुळे त्यांनी तडजोड करत एका शाळेत प्रवेश-स्तराची प्रशासकीय नोकरी स्वीकारली. मात्र काही दिवसांतच UPSCच्या PDS योजनेतून एका कॉर्पोरेट कंपनीचा फोन आला. त्यांची UPSC परीक्षेतील कामगिरी, शैक्षणिक पात्रता आणि बौद्धिक क्षमतेचा विचार करून त्यांना मध्यम-ज्येष्ठ पदावर भरती करण्यात आलं. पगारही शाळेतील नोकरीपेक्षा अनेक पटींनी अधिक मिळाला.
‘सत्तेची खाज आणि चोरीचा माल’; उद्धव ठाकरेंची बॅटिंग, एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
कंपन्यांना माहिती कशी मिळते ?
PDS योजनेअंतर्गत, UPSCने एक खास पोर्टल सुरू केलं आहे. यावर नोंदणीकृत कंपन्या त्यांचा कॉर्पोरेट ओळख क्रमांक (CIN) वापरून प्रवेश मिळवतात. फक्त त्या उमेदवारांची माहिती दिसते, ज्यांनी स्वतःहून ती सामायिक करण्यास संमती दिली आहे. या पोर्टलवर उमेदवारांचा संक्षिप्त बायोडेटा, शैक्षणिक पात्रता आणि संपर्क तपशील उपलब्ध असतो. कंपन्या त्यांच्या गरजेनुसार शोध घेऊन उमेदवारांची निवड करू शकतात.
या प्रक्रियेवर UPSC स्वतः देखरेख करत आहे. कंपन्यांना नियमितपणे लॉगिन सुविधा, कॉल आणि निवड प्रक्रियेची सूचना दिली जाते. नियुक्ती पत्रे पोर्टलवर अपलोड करण्याची सुविधाही आहे, ज्यामुळे आयोगाला निवडलेल्या उमेदवारांचा डेटा रिअल-टाईम अपडेट करता येतो. योजना सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. मात्र, खासगी क्षेत्राचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, ती भविष्याचा मोठा टप्पा ठरू शकते. या योजनेचे दुसरे नाव म्हणजे ‘Talent Pool’ किंवा ‘प्रतिभा सेतू’. या योजनेची 2018 मध्ये सुरुवात झाली होती. मात्र, तेव्हा ती फक्त सरकारी संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांपुरती मर्यादित होती. आता खासगी क्षेत्रालाही सामावून घेतल्याने, या योजनेंतर्गत गुणवत्तावान पण निवड न झालेल्या हजारो उमेदवारांसाठी नवे करिअर मार्ग खुले झाले आहेत.