Download App

Uttarakhand : …म्हणून ‘हे’ मंदीर वर्षातून एकदाच रक्षाबंधनच्या दिवशीच उघडते

Uttarakhand : रक्षाबंधन या सणाला उत्तर भारतात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र भावा-बहिणीच्या या सणासाठी लगबग पाहायाला मिळत आहे. त्यात उत्तराखंडमध्ये मात्र भाविकांची लगबग एका वेगळ्याचं कारणासाठी सुरू आहे. ते म्हणजे चमोली जिल्ह्यातील मंदीरात दर्शनासाठी जाण्यासाठी. आता तुम्ही म्हणालं रक्षाबंधनला राखी बांधण्याऐवजी हे लोक या मंदीरात जाण्यासाठी एवढे उत्सुक का आहेत?

Rajkumar Rao शाडू मूर्तीने नाही तर ‘असा’ साजरा करतो इको-फ्रेंडली गणेशोत्सव !

तर याचं कारण ही तसंच आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील हे मंदीर वर्षातून एकदाच रक्षाबंधनच्या दिवशीच उघडले जाते. वंशी नारायण मंदिर असं या मंदीराचं नाव आहे. समुद्र सापाटीपासून हे मंदीर तब्बल 12 हजारहून अधिक उंचीवर आहे. रक्षाबंधन जवळ येताच या मंदीराची साफ-सफाई केली जाते. तर रक्षाबंधनच्या दिवशी सुर्योदय होताच हे मंदीर उघडले जाते आणि सुर्यास्त होताच ते बंद केले जाते.

मात्र हे मंदिर वर्षातून एकदाच उघडण्यामागील अख्यायिका काय आहे जाणून घेऊ…

असं म्हटलं जात जेव्हा भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण करून बळीराजाचा अहंकार नष्ट केला होता. तेव्हा बळीने भगवान विष्णूंना प्रार्थना केली होती की, त्यांनी त्याच्या समोरच त्याच्या जवळच राहावं. तेव्हा पासून भगवान विष्णू बळीराजाचे द्वारपाल बनून राहू लागले होते. मात्र एकडे भगवान विष्णू परत न आल्याने त्यांची पत्नी देवी लक्ष्मी पाताळात गेली. तिने बळीला राखी बांधून भगवान विष्णूंना परत मागितले. जेव्हा भगवान विष्णू परत आले. तेव्हापासूनच या मंदीराला वंशी नारायण मंदीर असं म्हटलं जात. तर भगवान विष्णू याचं मंदीरात परत आल्याची लोकांची भावना आहे.

धक्कादायक! Gadar 2 पाहायला गेला अन् तरूणाने थिएटरमध्येच घेतला अखेरचा श्वास

त्यामुळे विष्णू रक्षाबंधनच्या दिवशी पाताळातून येथे परतल्याने या हे मंदीर केवळ वर्षातून एकदाच रक्षाबंधनच्या दिवशीच उघडले जाते. या दिवशी भगवान विष्णूंचा शृंगार केला जातो. तसेच प्रत्येक भाविक या मंदीरात येताना भगवान विष्णूंना लोणी आवडतं म्हणून लोण्याचा नैवेद्य दाखवतात. अशी या मंदीराची अख्यायिका सांगितली जाते.

Tags

follow us