Download App

Uttarkashi Tunnel : 17 दिवसांच्या हिंम्मत अन् आत्मविश्वासाची कहाणी

  • Written By: Last Updated:

Uttarkashi Tunnel : वेळ आली होती पण काळ आला नव्हता. ही म्हण चपखल लागू पडलेली चित्त थरारक घटना म्हणजे तब्बल 17 दिवस उत्तरकाशीच्या (Uttarkashi Tunnel ) सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना. मात्र हे 17 दिवस म्हणजे मजूर आणि रेस्क्यू टीमच्या हिंम्मत अन् आत्मविश्वासाचे ठरले हे 17 दिवस कसे होते? दरम्यान काय-काय घडलं? मजुरांना कसं वाचवलं? त्यांना वाचवणारे ते देवदूत कोण होते ही सर्व कहाणी जाणून घेऊयात सविस्तर…

सुरूवातीला पाहुयात या बोगद्यात हे मजूर कसे अडकले?

उत्तरकाशी बोगदा हा चार धाम योजनेतील एक हिस्सा आहे. या योजने अंतर्गत हिमालयातील राज्यांमधील प्रमुख हिंदु धार्मिक स्थळं दोन लेनच्या पक्क्या रस्त्यांद्वारे जोडली जात आहेत. या बोगद्याची लांबी साडेचार किलोमीटर आहे. तर 12 नोव्हेंबरला याच सिल्क्यारा बोगद्याजवळ मजूर नेहमीप्रमाणे काम करत होते. त्यावेळी अचानक पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळण्यास सुरुवात झाली. अनेक कामगारांनी बाहेर पळण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी बोगद्याचा 60 मीटरचा भाग खचला आणि 41 कामगार बोगद्यात अडकून पडले.

Uttarkashi Tunnel मधून मुलाच्या सुटकेची बातमी ऐकण्याआधीच वडिलांचं निधन; कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर

त्यानंतर एकीकडे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना बोगद्यात अडकलेल्या मजुरांना अन्न-पाणी पाठवण्यासाठी छोटा पाईप ड्रिल करण्यात आला. अन्नासोबत कॅमेरे, वॉकीटॉकी पाठवण्यात आल्या त्यातून मजूरांशी संवाद साधून त्यांचे मनोधैर्य वाढवलं. कुटुंबियांशी संवाद करून दिल्याने त्यांना धीर मिळाला तसेच तज्ज्ञांकडून योगा, प्राणायम करण्याचे मार्गदर्शन, वेळ घालवण्यासाठी लुडो, पत्ते आणि बुद्धिबळ बोगद्याच्या आत पाठवण्यात आले. यामध्ये जे मजूर होते ते उत्तराखंडमधील 2, हिमाचल प्रदेश 1, उत्तर प्रदेशातील 8, बिहारमधील 5, पश्चिम बंगालमधील 3, आसामचे 2, झारखंड राज्यातील 15, ओडिशातील 5 असे एकुण 8 राज्यांतील मजूर होते.

कसं वाचवलं?

त्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यात आधी हॉरिझाँटल ड्रिलिंग करण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यात यश आलं नाही. त्यामुळे अमेरिकेहून ऑगर मशीन मागवण्यात आलं. ऑगर मशीनने 48 मीटरपर्यंत ड्रील केले होते. पण त्यानंतर मशीनने हात टेकले. मशीन ड्रील केलेल्या भागातच तुटून अडकून पडली. त्यामुळे व्हर्टिकल ड्रिलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे तब्बल 86 मीटरचे आव्हानात्मक काम होते.

War 2: अ‍ॅक्शन सीन्सचा थरार अन्…; हृतिक रोशनच्या ‘वॉर 2’ सिनेमा ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

त्याचवेळी हॉरिझाँटल ड्रिलिंगही सुरु ठेवण्यात आले. त्यानंतर मशीनचे तुटलेले आणि अडकलेले भाग ड्रिंलिंग केलेल्या भागातून कापून वेगळे करण्यात आले. त्यानंतर उर्वरित 10 मीटरचे खोदकाम मानवी हातांनी करण्याचे आव्हान उभे राहिले होते. हे काम दृष्टीपथात येताच कंपनामुळे माती आणखी खाली येत असल्याने व्हर्टिकल ड्रिलिंग थांबविण्यात आले. हे तब्बल 45 मीटर ड्रिलिंग झाले होते. दुसऱ्या बाजूला हॉरिझाँटल ड्रिलिंगमध्ये मॅन्युअल ड्रिलिंगसाठी दोन खासगी कंपन्यांच्या दोन टीम तैनात करण्यात आल्या होत्या. खोदकाम जसे पुढे जाईल तसे पाठीमागून 800 मिमी व्यासाचा पाइप टाकण्याचे काम सुरु होते. याच पाईपमधून कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं

यामध्ये विविध अत्याधुनिक यंत्रणा वापरल्या खऱ्या मात्र ज्या रॅट होल मायनिंगवर सरकारने बंदी घातलेली आहे. पण हीच जीवघेणी पद्धत 41 मजुरांसाठी ‘देवदूत’ ठरली. यासाठी एक लांब अरुंद बोगदा तयार करतात उंदाराच्या बिळात शिरल्याप्रमाणे छोट्या बोगद्यातून बसून आत जावे लागते या मुळे या पद्धतीला रॅट होल म्हंटले जाते. तर सरकारने बंदी घातलेली आहे. कारण वीज चोरी होती तशीच खनिजांचीही चोरी होते. मेघालयात कोळसा, लोहखनिज, चुनखडी आणि डोलोमाइटचे प्रचंड साठे आहेत. ही खनिजे काढण्यासाठी स्थानिक लोक एकत्र येतात आणि उदरनिर्वाहासाठी खनिजांची चोरी करतात.

रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करणारे ‘हिरो’

तर या मजुरांना 17 दिवसांनंतर काळकोठडीतून बाहेर काढणाऱ्या रेस्क्यू ऑपरेशनच्या देवदूतांबद्दल सांगायचं झालं तर त्यात आयएएस अधिकारी नीरज खैरवाल, टनेल तज्ञ ख्रिस कूपर, निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन, टनेलिंग तज्ञ अर्नोल्ड डिक्स यांची महत्त्वाची भूमिका राहिली. एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय लष्कर, राज्य आणि केंद्रीय एजन्सी यांनी देखील बचाव कार्यात मोठी भूमिका बजावली. तर यातील नीरज खैरवाल हे या घटनेसाठी नोडल अधिकारी होते. ते सीएमओ आणि पीएमओला सातत्याने अपडेट देत होते.

ख्रिस कूपर हे इंजिनियर आणि मायक्रो टनेल तज्ञ आहेत. त्यांना अनेक दशकांचा अनुभव आहे. ते ऋषिकेश कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्पाचे आंतरराष्ट्रीय सल्लागार देखील आहेत. सय्यद अता हसनैन हे हे उत्तराखंड टनेल एक्स्ट्रॅक्शन मिशनमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या भूमिकेत होते. या अगोदर ते श्रीनगरमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जीओसी 15 कॉर्प्सचे सदस्य होते.

वैज्ञानिक संशोधक आणि भूमिगत बोगदा तज्ञ अर्नोल्ड डिक्स हे सुरुवातीपासून बोगद्याच्या ड्रिलिंगसाठी अमेरिकन ऑगर्सच्या वापरावर लक्ष ठेवत होते. ते ऑस्ट्रेलियाचे असून आंतरराष्ट्रीय टनेलिंग आणि अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. अर्नोल्ड डिक्स यांनी आजतागायत अनेक बचाव कार्ये यशस्वीपणे पार पाडली आहेत. या यशस्वी रेस्क्यूनंतर रेस्क्यू टीमचे कर्मचारी रामदास शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली की, अडकलेल्या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढताना अनेक आव्हाने समोर होती. परंतु आम्हाला मजूरांचा जीव वाचवायचा होता. सर्व मजूर बोगद्यातून बाहेर आले आहेत. सर्व मजूर एकदम फिट असून मजूरांना वाचवल्यानंतर त्यांनी आमच्या गळ्यात पडून आभार मानले.

तर 17 दिवसांनंतर सुखरूप बाहेर आल्यानंतर कामगारांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. यातीलच एक कामगार झारखंडचा रहिवासी असलेल्या सुबोध कुमार वर्माने बोगद्याच्या आत 17 दिवस कसे गेले त्याचा अनुभव सांगितला. तो म्हणाला की, सुरुवातीचे 24 तास आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत जिकिरीचे होते. काय होईल काहीच सांगता येत नव्हतं. आम्हाला काही खायलाही मिळालं नाही. त्यानंतर मात्र कंपनीने पाईपद्वारे काजू,बदाम, किसमिस, पुडिंग असे खाद्यपदार्थ पाठवले. त्यानंतर पुढे दहा दिवसांनी जेवण पाठवले जाऊ लागले. या सतरा दिवसांत कंपनीने आमची काळजी घेतली. सर्वतोपरी मदत केली. त्यामुळे माझी कंपनीबाबत तक्रार नाही. सगळ्यांच्या प्रार्थना आमच्या पाठिशी होत्या. म्हणून मी आणि माझे सहकारी बाहेर येऊ शकलो.

त्यामुळे या घटनेत मजुरांचं 17 दिवस बोगद्याच्या काळ कोठडीत हिंमत न हारता तग धरून राहणं असो कींवा त्यांना वाचवणाऱ्या देवदूतांचे जोखीम घेऊन केलेले प्रयत्न असो ही 17 दिवसांची हिंम्मत अन् आत्मविश्वासाची कहाणी प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारी अशीच आहे. त्यामुळे मजूरांचे अभिनंदन आणि त्यांना वाचवणाऱ्या रेस्क्यू टीमला सलाम…

Tags

follow us